अहमदनगर जिल्हा दुष्काळमुक्त करणार! डॉ. सुजय विखेंना साथ द्या -फडणवीस

अहमदनगर जिल्हा दुष्काळमुक्त करणार! डॉ. सुजय विखेंना साथ द्या -फडणवीस

Ahmednagar Lok Sabha Election : नगर जिल्हा दुष्काळमुक्त करण्याचं धोरण महायुती सरकारचं आहे. (Ahmednagar Lok Sabha) जिल्ह्यातील दक्षिण आणि उत्तर भागासाठी सुरू असलेले जल सिंचणाचे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी पाहिजे तेवढा निधी उपलब्ध करूण देण्याची ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली. (Sujay Vikhe) जामखेड येथे महायुतीच्या प्रचार सभेत बोलत होते.

 

देशाला दाखवून देऊ अहमदनगर जिल्हा मोदींच्या पाठीशी आहे -संग्राम जगताप

सबका साथ सबका विकास

फडणवीस म्हणाले की, ही निवडणूक गल्लीतील निवडणूक नसून देशाचा नेता ठरवणारी निवडणूक आहे. या देशाला कोण सुरक्षित ठेवू शकतो, देशाला कोण विकासाकडे नेवू शकतो. आणि सामान्य माणसाच्या आशा आकांक्षा पूर्ण करू शकतो याचा फैसला करणारी निवडणूक आहे. यामुळे पंतप्रधान पदांची संगीत खुर्ची खेळणाऱ्यांच्या मागे जावू नका. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सबका साथ सबका विकास म्हणत देशाला विकासात पुढे आणलं आहे. यामुळे डॉ. सुजय विखे यांना मत म्हणजे मोदींना पंतप्रधान करण्यासाठी मत ही जाणीव ठेवा असंही फढणवीस यावेळी म्हणाले.

 

इंजिनमध्ये कुणाला जागा नाही

उपमुख्यमंत्री फडणवीसांनी मागील १० वर्षात पंतप्रधान मोंदीच्या मार्फत झालेल्या कामांचा उवापोह करत इंडिया आघाडीचा यावेळी चांगलाच समाचार घेतला. त्यांनी सांगितलं की, मोदींकडे विकासाची गाडी असून त्यात महायुतीच्या पक्षांचे डबे आहेत आणि त्यात सर्व सामान्य जनतेला जागा आहे. तर इंडिया आघाडीकडे केवळ इंजिन आहेत आणि इंजिनमध्ये कुणाला जागा नाही असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. दरम्यान, काँग्रेसच्या काळात ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर 10 हजार कोटी रुपयांचा इनकम टॅक्स होता. पंतप्रधान मोदी सत्तेत आल्यावर त्यांनी कायदा बदलून हा टॅक्स रद्द करून शेतकऱ्यांना दिलासा दिला. त्याचबरोबर मोदी सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 24 तास वीज दिली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

 

महाराष्ट्राच्या विकासासाठी महायुती कटिबद्ध, सुजय विखेंची मतदारांना ग्वाही

जिल्ह्याचा दुष्काळ आपल्याला संपवायचाय

डॉ. सुजय विखे यांनी मागील पाच वर्षात जिल्ह्यात विकासाची भरगोस कामे केली आहेत. जिल्ह्यातील सर्व प्रकारचा दुष्काळ कमी करण्यासाठी त्यांनी विविध मागण्या केल्या आहेत. येणाऱ्या काळात सुजय विखेंच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात जिल्ह्याचा दुष्काळ आपल्याला संपवायचा आहे. यामुळे येत्या १३ तारखेला कमळ चिन्हाचं बटण दाबून सुजय विखे यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह आमदार सुरेश धस, भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज