Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि शरद पवार यांचे नातू रोहित पवार (Rohit Pawar ) यांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना खोचक सल्ला दिला. ते म्हणाले की, फडणवीसांवर कामाचा लोड वाढला असेल तर त्यांनी फक्त गृहमंत्रिपद सांभाळाव अन्यथा राजीनामा द्यावा. रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो या कंपनीवर ईडीने धाडी टाकल्यानंतर आज (6 जानेवारी) त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते
लोड वाढलाय तर फक्त गृहमंत्रिपद सांभाळा…
या पत्रकार परिषदेत रोहित पवार म्हणाले की, माझ्या कंपनीवर टाकलेल्या धाडींमध्ये अधिकाऱ्यांचं काहीही चुकलेलं नाही. त्यांना सांगण्यात येतं. तेच ते करतात. त्याचबरोबर या कारवाईमध्ये आम्ही आणि ईडी अधिकारी यांच्यामध्ये असणाऱ्या गोष्टी माध्यमांपर्यंत पोहोचतात कशा? आम्ही तर अशा प्रकारे कोणतीही माहिती मीडियापर्यंत पोहोचवलेली नाही.
पत्नीचा फोटो लग्नाच्या शुभेच्छा अन्…; मोहोळनं हत्येपूर्वी ठेवलेले व्हॉट्सअप स्टेटस व्हायरल
यावरूनच लक्षात येते की, अशा प्रकारच्या ईडीच्या छापेमारीतून आम्हाला नाही तर काही लोकांना राजकारण करायचं आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना मला एवढेच सांगायचं आहे. तुम्ही ज्या शहरात असता त्यादिवशी दिवसाढवळ्या लोकांचे खून होतात. देशातील सर्वात खराब पोलीस व्यवस्था महाराष्ट्रात आहे.
Daniel Webber: गीतकार डॅनियल वेबरने नव्या गाण्यातून मिळाला जुन्या आठवणींना उजाळा
कारण फडणवीसांवर कामाचा लोड वाढला आहे. त्यामुळे त्यांनी उपमुख्यमंत्रिपद बाजूला ठेवावं. फक्त गृहमंत्री पद सांभाळावं जेणेकरून गरीब जनतेला न्याय मिळेल. तसेच जर त्यांना गृहमंत्री म्हणून लोकांना न्याय देता येत नसेल तर त्यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा. स्वतः काय करतात? त्यावर जास्त बोलावं. दुसऱ्यांच्या गोष्टीवर बोलू नये. असं म्हणत यावेळी रोहित पवारांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे.
दरम्यान रोहित पवारांच्या कंपनीवर ईडीने कारवाई केल्यानंचतर भाजपवर टीका झाली. त्यावर फडणवीस म्हणाले होते की, रोहित पवारांच्या संस्थेवर इडीने केलेल्या कारवाईला भाजपच्या सुडाच्या राजकारणाची जोड देणे म्हणजे विनाकारण शहीद होण्याचे प्रयत्न आहे. छापेमारी झाल्याची मला माहिती नाही. रोहित पवार बिजनेस करतात, बिजनेसमध्ये अशा गोष्टी होत असतात. जर त्यांनी सगळे नीट केले असेल तर घाबरण्याचे काहीच कारण नाही. या प्रकरणाला राजकारणाशी जोडू नका, असे आवाहन देवेंद्र फडणवीसांनी केले होते.