Video : पत्नीचा फोटो लग्नाच्या शुभेच्छा अन्…; मोहोळनं हत्येपूर्वी ठेवलेले व्हॉट्सअप स्टेटस व्हायरल
पुणे : कुख्यात गुंड शरद मोहोळचा काल (दि.5) भर दुपारी कोथरूड परिसरातील सुतारदरा भागात खून करण्यात आला. काल मोहोळच्या लग्नाचा वाढदिवस होता. त्यामुळे तो पत्नी स्वाती मोहोळ यांच्यासोबत गणपतीच्या दर्शनाला जाणार होता. मात्र, त्याआधीच त्याचा खून करण्यात आला. त्यानंतर आता मोहोळने हत्यापूर्वी ठेवलेले व्हॉट्सअप स्टेटस समोर आले आहे. यात त्याने पत्नी स्वाती यांचा फोटो ठेवत लग्नाच्या शुभेच्छा दिल्याचे दिसून येत आहे.
स्टेटसमध्ये नेमकं काय?
शरद मोहोळच्या व्हायरल होणाऱ्या स्टेटसमध्ये त्याने पत्नी स्वाती यांच्यासोबतचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंच्या बॅग्राउंडला त्याने ‘दूर तुझसे मे रहके बता क्या करू?’ हे गाणे ऐकायला मिळत आहे. ‘दूर तुझसे मे रहके बता क्या करू?’ या गाण्यावर शरद मोहोळ याने पत्नी स्वाती मोहोळ (भाजपा सरचिटणीस महिला मोर्चा) यांच्या सोबतचा फोटो पोस्ट करून लग्नच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर पुढच्या काही तासातच त्याच्यावर गोळीबार करत त्याचा खून करण्यात आला.
सुतारदरा परिसरात भर दुपारी नेमकं काय घडलं?
शरद मोहोळ याची काल (दि.6) भर दुपारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली. शरद मोहोळ याच्यावर गोळीबार करण्यापूर्वी आरोपींनी मोहोळच्या घरी एकत्र जेवण केले होते. मोहोळच्या लग्नाचा काल वाढदिवस होता.जेवण झाल्यानंतर हे सर्व बाहेर पडले होते.
कुख्यात गुंड मोहोळची हत्या कुणी केली ? गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी थेट तपासाची दिशाच सांगितली !
शरद मोहोळ पुढे तर आरोपी त्याच्या मागून चालत होते. त्यावेळी मागून चालणाऱ्या आरोपींनी त्यांच्याकडील बंदुकीतून गोळ्या झाडण्यास सुरूवात केली. यात आरोपींनी चार राऊंड फायर केले. त्यातील दोन गोळ्या शरद मोहोळच्या मानेत, एक छातीत तर एक गोळी डोक्यात लागली. या सर्व घटनेत शरद मोहोळ गंभीर झाला होता. त्यानंतर त्याला तत्काळ जवळ असणाऱ्या एका खासगी रूग्णालयात दाखल करण्या आले. मात्र, उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला.
भर दुपारी खून झाल्याने खळबळ
कोथरूड परिसरातील सुतारदरा दवाखाना परिसरात शरद मोहोळवर दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास मोहोळवर 3 ते 4 जणांनी गोळीबार केला. या हल्ल्यात मोहोळ गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर त्याला कोथरूड परिसरातील एका खासगी रूग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान मोहोळचा मृत्यू झाला. भर दुपारी अशा प्रकारची घटना घडल्याने मोठी दहशत परसली आहे.
कोण होता शरद मोहोळ?
मोहोळने येरवडा कारागृहात विवेक भालेरावच्या साथीने दहशतवादी कृत्यांमध्ये सहभागी असलेला आरोपी कतील सिद्दीकीचा खून केला होता. या प्रकरणात जामीनही मिळाला होता. जुलै 2022 मध्ये मोहोळला पुणे जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी तडीपारही करण्यात आले होते. शरद मोहोळ हा पुण्यातील कुख्यात गुन्हेगार असून, त्याच्यावर हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, अपहरण यांसारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. मोहळला पिंटू मारणे हत्येप्रकरणात अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याला या प्रकरणात जामीन मिळाला होता. मात्र, दासवे गावचे सरपंच शंकर धिंडले यांच्या अपहरणात त्याला पुन्हा अटक झाली होती.
Pune Crime: मोहोळने हत्येच्या काही वेळापूर्वी ठेवले होते स्टेटस, Video Viral #sharadmohol #Murder #SharadMoholMurder #punecrime #crimenews #PuneNews #BreakingNews #NewsUpdate #UpdateNews #LetsUppMarathi #PunePolice pic.twitter.com/QsB1vxfEvH
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) January 6, 2024