माझ्या काकांचा जळालेला चेहरा कधीच विसरणार नाही; पुतळे जाळणाऱ्यांना रोहित पवारांचे सडेतोड उत्तर

Rohit Pawar हे अहिल्यानगर येथे आले असता त्यांनी पुतळे जाळणाऱ्यांना भावनिक पण तितकेच आक्रमक उत्तर दिले आहे.

Rohit Pawar

Rohit Pawar

Rohit Pawar on Ajit Pawar Plane accindent after Criticize him : राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. आज अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालय येथे आमदार रोहित पवार आले असता प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी अपघाताबाबत सातत्याने प्रश्न उपस्थित करणारे आमदार रोहित पवार यांनी आता पुतळे जाळणाऱ्यांना भावनिक पण तितकेच आक्रमक उत्तर दिले आहे. तुमच्या नेत्याला खूश करण्यासाठी तुम्ही माझे कितीही पुतळे जाळा, माझ्यावर कितीही व्यक्तिगत टीका करा मात्र अजितदादांना न्याय मिळेपर्यंत माझा लढा थांबणार नाही, असा ठाम निर्धार रोहित पवार यांनी व्यक्त केला.

हातात कॅमेरा-माईक असला म्हणजे पत्रकार होता येत नाही! रील स्टार्सना पत्रकारांचे संरक्षण देण्यास दिल्ली पोलिसांचा विरोध

अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणावरून रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत काही गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. व्हीएसआर कंपनीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे संबंधितांना वाचवत आहेत का, अशी शंका त्यांनी व्यक्त केली होती. त्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांकडून राज्यातील विविध ठिकाणी रोहित पवार यांचे पुतळे जाळण्यात आले. या पार्श्वभूमीवर बोलताना त्यांनी टीकाकारांना चांगलेच सुनावले. तुमची तुमच्या नेत्यांप्रती असलेली बांधिलकी मी समजू शकतो. नेत्याला खूश करण्यासाठी तुम्ही पुतळे जाळत असाल तर त्याबद्दल मी तुम्हाला माफ करतो. मी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्याऐवजी पुतळे जाळून काय साध्य होणार माझ्या मुद्द्यांवर तुमचे नेते कधी उत्तर देणार, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.

अजित पवारांचा 85 टक्के प्रवास VSR कंपनीच्या विमानातून ; महत्त्वाचा डेटा समोर

.यावेळी रोहित पवार भावूकही झाले. एक पुतण्या म्हणून घटनास्थळावरील परिस्थिती मी स्वतः पाहिली आहे. माझ्या काकांचा तो जळालेला चेहरा मी कधीही विसरू शकत नाही. ती वस्तुस्थिती माझ्या मनातून कधीही जाणार नाही. त्यामुळे तुम्हाला काय जाळायचे ते जाळा, कितीही विरोध करा पण अजितदादांना न्याय मिळेपर्यंत मी शेवटपर्यंत लढत राहणार, असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला.

ऊन घेण्यासाठी गच्चीवर गेले, काही वेळातच मृतावस्थेत आढळले; पुण्यात निवृत्त लेफ्टनंट जनरलसोबत काय घडलं?

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र देऊन केली सीबीआय चौकशीची मागणी व विके सिंग हा परदेशात पळून जाण्याचा केला संशय व्यक्त या प्रकरणाचा तपास अधिक व्यापक आणि पारदर्शक व्हावा, यासाठी रोहित पवार यांनी आता केंद्र सरकारकडेही धाव घेतली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र पाठवून अजित पवार यांच्या विमान अपघाताचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपवण्याची मागणी त्यांनी केली आहे. तसेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनाही पत्र पाठविल्याची माहिती त्यांनी दिली.

Smart Phone Access : मोबाईलमध्ये ‘Allow’ बटण दाबताच सुरू होतो प्रायव्हसीचा खेळ; पण, कसा?

या प्रकरणात काही नवीन पुरावे आणि महत्त्वाची माहिती हाती लागली असून, येत्या काही दिवसांत ती समोर आणणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.या संपूर्ण प्रकरणात व्हीएसआरशी संबंधित विके सिंग यांच्या संभाव्य अमेरिका दौऱ्याचा मुद्दाही रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे. विके सिंग हे अमेरिकेला जाण्याच्या तयारीत असल्याचा संशय व्यक्त करत त्यांना परदेशात जाण्याची परवानगी द्यायची की नाही, याचा निर्णय सरकारने घ्यावा, असे त्यांनी म्हटले आहे. संबंधित व्यक्ती देशाबाहेर गेल्यास तपासाच्या दृष्टीने अडचणी निर्माण होऊ नयेत, यासाठी आपण अमित शहा यांना पत्राद्वारे माहिती दिल्याचेही त्यांनी सांगितले.

 

Exit mobile version