राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP ) युवा आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) यांनी ट्विट करत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. एमपीएससीचा ( MPSC ) अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरुन त्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी काही दिवसांपूर्वी आंदोलन केले होते. एमपीएससीची नवीन परीक्षा पद्धती 2025 सालापासून लागू करावी, अशी विद्यार्थ्यांची मागणी होती. याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. काही क्लासेसच्या दबावामुळे सरकार हा निर्णय घेत नसल्याचे, विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे, असा आरोप रोहित पवारांनी केला आहे.
#MPSC ची नवी परीक्षा पद्धती २०२५ पासून लागू करण्याची मागणी शासनाने मान्य करून बरेच दिवस उलटूनही अजून काहीही कार्यवाही झालेली नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वतः विद्यार्थ्यांशी फोनवरून संवाद साधत शब्द दिला होता, पण तो शब्द अजूनही पाळला गेलेला नाही. pic.twitter.com/0SuuEtxmLL
— Rohit Pawar (@RRPSpeaks) February 17, 2023
एमपीएससीची नवी परीक्षा पद्धती 2025 पासून लागू करण्याची मागणी शासनाने मान्य करून बरेच दिवस उलटूनही अजून काहीही कार्यवाही झालेली नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वतः विद्यार्थ्यांशी फोनवरून संवाद साधत शब्द दिला होता, पण तो शब्द अजूनही पाळला गेलेला नाही, असे म्हणत पवारांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
काही क्लासेसच्या दबावामुळे सरकार निर्णय घेत नसल्याचं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. हे खरं असेल तर या सरकारएवढं असंवेदनशील सरकार दुसरं नसेल, असे म्हणत पवारांनी सरकारवर टीका केली आहे. तसेच त्यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांना देखील टोला लगावला आहे. स्वतःच्या मिरवणुका काढून घेणारे चॉकलेट हिरो तर गायबच झालेत. एसटी कर्मचाऱ्यांसारखा या विद्यार्थ्यांना चुना लावू नका, ही या चॉकलेट हिरोंना विनंती, असे म्हणत त्यांनी पडळकर यांच्यावर देखील निशाणा साधला आहे.