Download App

Mumbai Jaipur Express Firing : ‘गोळीबारानंतर प्रवाशांनी चेन..,’ जी.आर.पी. आयुक्तांनी सांगितला घटनाक्रम…

Mumbai Jaipur Express Firing : जयपूरहुन मुंबईकडे येणाऱ्या एक्सप्रेस रेल्वेमध्ये आरपीएफच्या जवानाकडून गोळीबार केल्याची घटना घडली. या घटनेत चार जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये RPF जवान टीकाराम आणि तीन प्रवाशांचा मृत्यू झाला असून आरोपी RPF जवान चेतन सिंगला पोलिसांनी मोठ्या धाडसांनी अटक केल्याची माहिती जी.आर.पी. आयुक्तांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. दरम्यान, या घटनेनंतर रेल्वेत प्रवास करणाऱ्या प्रवाशामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं चर्चेतलं विधान! ‘शरद पवार म्हणजे जपानी गुडीयाचं’…

नेमकं काय घडलं?
राजस्थानमधील जयपूरहुन मुंबईकडे सेंट्रल एक्सप्रेस ही रेल्वे येत होती. एक्सप्रेस रेल्वे मुंबईतील मीरा रोडजवळ पोहचताच RPF चे जवान चेतन सिंग यांनी अंदाधुंद गोळीबार केला आहे. या गोळीबारामध्ये एका जवानासह तीन प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.

घटनेनंतर प्रवाशांमध्ये घबराटीचे वातावरण पसरलं होतं. त्यानंतर गोळीबारामध्ये आपला जीव वाचवण्यासाठी प्रवाशांनी सुरक्षा चेन खेचली. त्यानंतर आरोपी चेतन सिंगने धूम ठोकण्याचा प्रयत्न केला. मात्र, मीरा रोडजवळील रेल्वे स्थानकावर असलेल्या इतर RPF जवानांसह पोलिसांनी चेतन सिंगला मोठ्या शिताफिने अटक केली आहे.

Maharashtra Politics: विरोधकांना पाठिंबा की पीएम मोदींसोबत स्टेज शेअर करणार? सर्वांच्या नजरा शरद पवारांवर

गोळीबाराच्या घटनेनंतर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी चेतन सिंगची पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात आली आहे. ही घटना घडल्यानंतर पोलिसांकडून आरोपींसह इतर प्रवाशांची चौकशी करण्याचं काम सुरु आहे. या प्रकरणामध्ये घाईत कोणतीही माहिती देणं चुकीचं ठरणार असून तपासाअंती सविस्तर माहिती देणार असल्याची माहिती जी.आर.पी आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे.

Trial Period च्या यशानंतर जेनेलिया अन् मानवकडून आलिया सेनचं कौतुक

सूत्रांच्या माहितीनुसार, कॉन्स्टेबल चेतनची गुजरातमधून मुंबईत बदली झाली होती. चेतनचे कुटुंब गुजरातमध्येच राहत होते, त्यामुळे तो खूप मानसिक त्रासात होता.
गोळीबार करणारा कॉन्स्टेबल चेतन त्याच्या बदलीमुळे संतापला होता तसेच तो तणावातही होता. यात तणावाच्या स्थितीत चेतनने गोळीबार केला, असल्याचंही बोललं जात आहे.

दरम्यान, या घटनेनंतर प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून जे प्रवासी जयपुर-मुंबई एक्सप्रेसमधून प्रवास करीत होते, ते आत्ता घरी गेले आहे. त्यांचा पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. तसेच अटक केलेल्या RPF जवानाने हा गोळीबार नेमका कशासाठी केला? याबद्दल अद्याप अधिकृत माहिती पोलिसांकडून देण्यात आलेली नाही.

Tags

follow us