Nana Patole on Mahayuti : आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी (Vidhansabha Election) सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. अशातच आता कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी (Nana Patole) महायुतीमध्ये महाभारत चाललेलं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी हात वर केलाय. पुढच्या महिन्यात महायुतीमध्ये (Mahayuti) मोठी गडबड होण्याची शक्यता असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं.
पंतप्रधान मोदी जळगावात, ‘लखपती दिदीं’शी साधला संवाद, जंगी कार्यक्रमाचे फोटो पाहाच…
नाना पटोले यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. ते म्हणाले, महायुतीमध्ये सर्व काही सुरळीत चाललेले नाही. महायुतीमध्ये महाभारत चाललेलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी हात वर केले आहेत. महायुतीमध्ये मोठी गडबड सुरू आहे. पुढच्या महिन्यात महायुतीमध्ये मोठी गडबड होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं अंदाज पटोलेंनी व्यक्त केला.
इस्त्रायलला हिजबुल्लाहकडून जोरदार प्रत्युत्तर मात्र आजच का? ‘हे’ आहे कारण
निवडणुका घ्यायला घाबरत आहेत…
निवडणुका कधी लागतील हे सांगता येत नाही. निवडणूक आयोग भाजप कार्यालया बसल्याचे चित्र आहे. लाल किल्ल्यावरून भाषण करताना मोदी म्हणत होते, वन नेशन, वन इलेक्शन आणायचा आहे. मात्र, देशातील चार राज्यातील निवडणुका देखील घ्यायला ते घाबरत आहेत, असा टोला पटोलेंनी लगावला.
मोदी सर्वात असंवेदनशील पंतप्रधान
जळगाव येथे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत लखपती दिदी कार्यक्रम संपन्न झाला. यावर बोलतांना पटोले म्हणाले, जळगाव जिल्ह्यातील तीर्थयात्रेसाठी गेलेल्या श्रद्धाळूंचा अपघातात नेपाळ येथे मृत्यू झाला. त्यांचे मृतदेह आज जळगावात दाखल झालेत. मात्र, थोडीशी तरी माणुसकी असती तर भाजपने आणि पंतप्रधानांनी आजचा कार्यक्रम रद्द केला असता. एकीकडे लोकांच्या डोळ्यात अश्रू तर दुसरीकडे हे उत्साह साजरा करत आहेत. मोदींच्या रुपाने देशातील जनतेने सर्वात असंवेदनशील पंतप्रधान पाहिलाय, अशी टीका पटोलेंनी केली.
महिला अत्याचाराच्या घटनांवर बोलतांना पटोले म्हणाले, महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती भयावह आहे. कायदा-पोलिसांचा धाकच आता राहिला नाही. आणि तीन तोंडाचं हे सरकार लुटमारीमध्ये लागलेलं आहे, अशी टीका त्यांनी केली.