पंतप्रधान मोदी जळगावात, ‘लखपती दिदीं’शी साधला संवाद, जंगी कार्यक्रमाचे फोटो पाहाच…

Lakhpati Didi : जळगाव येथे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या उपस्थितीत लखपती दिदी (Lakhpati Didi) कार्यक्रम संपन्न झाला.

या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

लखपती दिदी (Lakhpati Didi) कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रोड शो देखील झाला.

दरम्यान, या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिभा भेट देत मोदींचं स्वागत केलं.

‘लखपती दिदी’ कार्यक्रमाला एक ते दीड लाख बचत गटाच्या महिला सहभागी झाल्या होत्या.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील स्त्रियांचा गौरव केला.

मोदींनी ‘लखपती दिदी’ कार्यक्रमात बोलताना महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या मुद्द्यावर भाष्य केलं. महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना सोडू नका, असं त्यांनी बजावलं.

यावेळी देवेंद्र फडणवीसांनीही महिलांना संबोधित केलं. विकसित भारत हा महिलांच्या माध्यमातूनच होऊ शकतो, असं ते म्हणाले.
