Download App

अंधारेंवरील विधानावर शिरसाटांना क्लीनचीट?; चाकणकरांची पहिली प्रतिक्रिया

शिवसेनेचे शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांच्यावर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा आरोप केला होता. संजय शिरसाट यांनी बोलताना सुषमा अंधारेंवर पातळी सोडून टीका केल्याचा आरोप करण्यात आला होता. यानंतर छत्रपती संभाजीनगर येथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. या प्रकरणामध्ये संजय शिरसाट यांना संभाजीनगर पोलिसांनी क्लीनचीट दिली असल्याची माहिती टीव्ही 9 मराठी वृत्त वाहिनीने दिली आहे. समोर व्यक्ती नसल्याने विनयभंग होत नसल्याचे अहवालात म्हटले आहे.  यावर आता महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

सुषमा अंधारे यांची तक्रार पोलिसांनी घेतली नव्हती. यानंतर त्यांनी राज्य महिला आयोगाकडे आपली तक्रार दिली होती. महिला आयोगाने पोलिसांना या प्रकरणाची सखोल चौकशी करुन त्याबाबताच अहवाल सादर करायला सांगितले होते. मध्यंतरी तणावाचे वातावरण असल्याने पोलिसांना 8 दिवसांचा कालावधी मागून घेतला होता. तो कालावधी देखील महिला आयोगाने दिला होता, असे चाकणकरांना सांगितले.

Ahmednagar name change : फडणवीसांचा होकार; अहिल्यानगरचा मुहूर्त ठरला…

या क्लीनचिट संदर्भात मी संभाजीनगर पोलिस आयुक्तांशी देखील बोलले. त्यांनी मला मी अशी कोणतीही क्लीनचीट दिली नसल्याचे सांगितले. ते सध्या रजेवर असून मी अशा कोणत्याही कागदावर सही केली नसल्याची माहिती त्यांनी दिली असल्याचे चाकणकरांनी सांगितले. जर अशा पद्धतीची क्लीनचिट देण्याचा प्रकार झाला असेल तर त्यांनी तो अहवाल आधी राज्य महिला आयोगाला द्यायला हवा होता, असे चाकणकरांनी सांगितले.

Madha Loksabha : रामराजेंचे नाव एकमताने पुढे येताच पवारांची सावध प्रतिक्रिया

दरम्यान, संजय शिरसाट यांनी माझ्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केल्याचा आरोप अंधारेंनी केला होता. त्यावरुन शिरसाटांवर जोरदार टीका देखील करण्यात आली होती. यानंतर आता त्यांना क्लीनचिट मिळाल्याचे कळते आहे. यावरुन चाकणकरांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Tags

follow us