Download App

Ruta Awhad यांचे महेश आहेर यांच्यावर गंभीर आरोप

ठाणे : एखाद्याच्या कुटुंबाबद्दल इतकं वाईट बोलून षडयंत्र रचणं, कुणा बाबाचं नाव घेऊन पैशांच्या आणि जमिनीच्या व्यवहाराबद्दल बोललं गेलंय. एखाद्या डॉनप्रमाणं आयुक्त त्या ऑडिओ क्लिपमध्ये बोलत आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड (jitendra Awhad) यांच्या पत्नी ऋता आव्हाड (Ruta Awhad)यांनी केलाय. त्या तथाकथित व्हायरल ऑडिओ क्लिपमधला आवाज हा ठाणे महानगरपालिकेचे अतिक्रमण विभागाचे सहायक आयुक्त महेश आहेर (Mahesh Aher)यांचाच असल्याचा दावा देखील ऋता आव्हाड यांनी केलाय. त्या म्हणाल्या, मी विविध कामांच्या निमित्तानं त्यांच्याशी बोलली आहे. त्यामुळे तो आवाज त्यांचाच असल्याचा विश्वास मला आहे.

इतके सर्व पुरावे हातात असताना आता पोलीस प्रशासन, कायदा-सुव्यवस्थेचे रखवाले काय करणार? असा सवालही ऋता आव्हाड यांनी उपस्थित केलाय. बुधवारी सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्याविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर ऋता आव्हाड यांनी माध्यमांशी बोलताना हे आरोप केले.

Mumbai मध्ये लिव्ह इन पार्टनरचा खून, कॉटमध्ये लपवला मृतदेह

ऋता आव्हाड म्हणाल्या की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरक्षा दिल्याबद्दल त्यांचे आभार. पण मुख्यमंत्री महोदय यांना मी सांगू इच्छिते की आता बस झालं. सर्वांना माहीत आहे की, महेश आहेर त्यांचे नाव घेऊन दहशत पसरवतात. मला देखील त्यांनी हे सांगितले. पण तेव्हा मी ते रेकॉर्ड केलं नाही.

आहेर मुख्यमंत्र्यांच्या मुलाच्या नावाने देखील दहशत पसरवली आहे. त्यांचे कनिष्ठ अधिकाऱ्यांचे जगणे देखील यांनी अवघड करुन ठेवलं आहे. पण जर वरचा माणूस जर आहेर यांच्यावर मेहेरबान असेल तर मग इतरांचं काय?

आयुक्त म्हणून महेश आहेर यांची कारकिर्द किती दैदीप्यमान आहे, हे पुढच्या काही दिवसांत सर्व लोकांसमोर येईलच. आजपर्यंत वेगवेगळ्या पक्षांनी त्यांच्यावर खूप आरोप केले. तरीही त्यांना सारखं वाचविलं जातं. त्यांच्यावर कुणाचा वरदहस्त आहे, हे आम्हाला माहीत नाही. ठाणे मनपातील ते एकटे असे अधिकारी नसून अशी बरीच उदाहरणं आहेत. ते आणि त्यांच्यासारखे जे अधिकारी आहेत, त्यांच्यावर जर पोलिसांनी कारवाई केली नाही, तर आम्ही कोर्टात जाऊ, अशी प्रतिक्रिया ऋता आव्हाड यांनी दिली.

आता फक्त आम्हाला सरंक्षण देऊ नका. पण सरंक्षण देण्यापेक्षा अशा अधिकाऱ्यांची बोलण्याची हिंमत कशी होते, ते पाहावे. अधिकारी स्वतः हे बोलतायत की, त्यांच्याकडून दुसरा कोणी वदवून घेतोय, हे पाहावे. तुम्हाला काय करायचे ते करा. आता आम्ही निकराची लढाई सुरु केली आहे. कारण आता माझ्या कुटुंबावर या सर्व गोष्टी आल्या आहेत, असेही त्या म्हणाल्या.

मुंब्र्यातील आमच्या एका कार्यकर्त्याला फोन करुन सांगितलं की, मी आव्हाड ठोकणार आणि पुढचा नंबर तुझा आहे. पण सामान्य लोकांना फोन रेकॉर्ड करण्याची सवय नसते. आम्ही त्याला विचारलं की, तू फोन रेकॉर्ड केलास का? तर त्यानं सांगितले एवढा मोठा अधिकारी असं बोलेल, याची मला जराही कल्पना नव्हती. एखादा गुन्हेगार असता तर त्याचा फोन नक्कीच रेकॉर्ड केला असता. हल्ली सर्वांना पुरावे हवे असतात. पुरावे दिले तरी ते काही फार तीर मारत नाहीत, असा आरोप ऋता आव्हाड यांनी केला.

Tags

follow us