Mumbai मध्ये लिव्ह इन पार्टनरचा खून, कॉटमध्ये लपवला मृतदेह

Mumbai मध्ये लिव्ह इन पार्टनरचा खून, कॉटमध्ये लपवला मृतदेह

मुंबई : राज्यात लिव्ह इन पार्टनरनं प्रेयसीचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. सोमवारी सायंकाळी नालासोपारा (Nalasopara)भागात ही घटना घडली. प्रेयसीची हत्या केल्यानंतर घरातील फर्निचर विक्री करून तो मुंबईहून (Mumbai) राजस्थानला (Rajsthan) पळून जात होता. मात्र, पोलिसांनी (Police) त्याला मध्यप्रदेशातील नागदा रेल्वेस्टेशनवरून अटक केली. पोलिसांनी सांगितलं की, शेजारी राहणाऱ्या लोकांना दुर्गंधी आल्यानं त्यांनी ही माहिती दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, हार्दिक शाह आणि मेघा तोरवी तीन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. दोघेही महिनाभरापूर्वीच सीता सदन इमारतीत भाड्यानं घर करून राहायला आले होते. मेघा व्यवसायानं नर्स होती, पण हार्दिक बेरोजगार होता. त्याचा खर्च मेघाला करावा लागला. यावरून दोघांमध्ये अनेकदा भांडणं होत होती. रविवारीही याच मुद्द्यावरून त्यांच्यात जोरदार भांडण झालं होतं. यामुळं रागाच्या भरात हार्दिकने मेघाची हत्या केली.
Nikki Haley यांनी सुरू केला निवडणूक प्रचार, म्हणाल्या, भारतीय असल्याचा अभिमान
तिच्या मृत्यूनंतर दुसऱ्या दिवशी मेघाच्या मृतदेहाची दुर्गंधी पसरली. घराच्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांनी याची माहिती पोलिसांना दिली. चौकशीदरम्यान हार्दिक आणि मेघा महिनाभरापूर्वीच येथे राहण्यासाठी आल्याचं समोर आलं. त्यांच्यात अनेकदा भांडण होत असायचं. यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासलं आणि आरोपीच्या फोनचं लोकेशन ट्रेस केलं.

मोबाईल लोकेशन ट्रेसिंगमध्ये तो मुंबईहून राजस्थानला जात असल्याचं निष्पन्न झालं. पोलिसांनी गुन्हे शाखा आणि रेल्वे पोलिसांच्या मदतीने मध्य प्रदेशातून त्याला पकडलं. त्याच्या फोनची तपासणी केली असता काही गोष्टी समोर आल्या आहेत.

पोलिसांनी सांगितलं की, मेघा केरळची रहिवासी असून ती एका नर्सिंग एजन्सीमध्ये काम करत होती. हार्दिकने काही महिन्यांपूर्वी वडिलांच्या खात्यातून 40 लाख रुपये खर्च केले होते. यामुळे त्याला घराबाहेर हाकलून देण्यात आलं. त्यानंतर दोघांनीही भाड्याच्या घरात एकत्र राहण्याचा निर्णय घेतला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube