Sachin Tendulkar : मराठी भाषेला (Marathi Language) अभिजात भाषेचा (Classical Language) दर्जा देण्यात यावा अशी मागणी मागील अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. अखेर केंद्र सरकारने महाराष्ट्रातील 60 कोटी जनेतमध्ये आनंद पसरेल असा निर्णय घेतलायं. 3 ऑक्टोबर रोजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला आहे. त्यानंतर सर्वच क्षेत्रातील नागरिकांकडून केंद्र सरकारच्या निर्णयाचं कौतूक केलं जात आहे. अशातच भारतीचा माजी क्रिकेटपट्टू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरच्या (Sachin Tendulkar) पोस्टने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलंय. मराठी भाषेला अभिजात दर्जा म्हणजे हा मराठी भाषेचा सन्मान असल्याचं सचिनने नमूद केलंय.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे मराठी मनाला अभिमान वाटतो. हा सन्मान आपल्या संस्कृतीच्या योगदानाला दिलेली ओळख आहे. बरोबरच असमिया, बंगाली, पाली, आणि प्राकृत या भाषांनाही हा सन्मान मिळाल्याबद्दल अभिनंदन! जास्तीत जास्त लोकांना या सुंदर भाषांचे सौंदर्य अनुभवता येईल!
— Sachin Tendulkar (@sachin_rt) October 6, 2024
मागील 60 वर्षांपासून महाराष्ट्रातील जनतेकडून मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यात यावा, अशी मागणी सातत्याने केली जात होती. या मागणीला राज्यातील सर्वच पक्षांकडून पाठिंबाही देण्यात आला होता. अखेर 3 ऑक्टोबरला मराठीसह, पाली, प्राकृत, आसामी, बंगाली भाषांनाही अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे.
मोठी बातमी! काँग्रेसचे आमदार अचानक शरद पवारांच्या भेटीला, नेमकं कारण काय?
मराठीला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर सचिन तेंडूलकरने एक पोस्ट शेअर केलीयं. या पोस्टमध्ये सचिन म्हणाला, “मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे मराठी मनाला अभिमान वाटतो. हा सन्मान आपल्या संस्कृतीच्या योगदानाला दिलेली ओळख आहे. बरोबरच असमिया, बंगाली, पाली, आणि प्राकृत या भाषांनाही हा सन्मान मिळाल्याबद्दल अभिनंदन! जास्तीत जास्त लोकांना या सुंदर भाषांचे सौंदर्य अनुभवता येईल!” अशी भावना सचिनने पोस्टद्वारे व्यक्त केलीयं.
काँग्रेस देशातील भ्रष्ट अन् बेईमान पार्टी; ठाण्यात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोंदींचा थेट घणाघात
मागील काही वर्षापासून सर्वच राजकीय पक्षाकडून याचा पाठपुरावा केला जात होता. २०१९ साली तत्कालीन केंद्रीय सांस्कृतिक मंत्री प्रल्हाद पटेल यांनी लोकसभेत सांगितलं होतं की, हा प्रस्ताव सक्रीय विचाराधीन आहे. त्याआधी २०१८ साली तत्कालीन सांस्कृतिक मंत्री डॉ. महेश शर्मा यांनी लेखी उत्तरात काय सांगितलं होतं तर हा प्रस्ताव केंद्राच्या सक्रीय विचाराधीन आहे. अखेर मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आहे.