शिंदेंचे आमदार सदा सरवणकरांवर गुन्हा दाखल, फडणवीसांची माहिती

राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज विधानपरिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलत होते. त्यावेळी त्यांनी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्या प्रकरणी त्यांच्यावरील गुन्ह्याची माहिती दिली आहे. सरवणकर यांनी गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत गोळीबार केल्याच्या त्यांच्यावर आरोप होता. सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याच्या प्रकरणामध्ये आत्तापर्यंत 14 साक्षीदार तपासल्याचे फडणवीसांनी सांगितले. त्यात सदा सरवणकर […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 03 25T170432.542

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out 2023 03 25T170432.542

राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज विधानपरिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलत होते. त्यावेळी त्यांनी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्या प्रकरणी त्यांच्यावरील गुन्ह्याची माहिती दिली आहे. सरवणकर यांनी गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत गोळीबार केल्याच्या त्यांच्यावर आरोप होता.

सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याच्या प्रकरणामध्ये आत्तापर्यंत 14 साक्षीदार तपासल्याचे फडणवीसांनी सांगितले. त्यात सदा सरवणकर व त्यांचा मुलगा समाधान सरवणकर यांच्यासह अन्य जणांना कलम 41च्या क 1 अन्वये नोटीस बजावण्यात आली आहे. त्याचप्रमाणे नियमानुसार लायसन्सधारी पिस्तुल जवळ बाळगणे आवश्यक आहे. पण त्यांनी ते पिस्तुल गाडीत ठेवले. त्यामुळे त्यांच्यावर आर्म्स अॅक्ट 1959 चे कलम 30 अन्वय कारवाई करण्यात आली आहे. तसेच नियमांचे उल्लंघन केल्याने पिस्तुल परवाना रद्द करण्यात आला आहे.

उत्तर ऐकण्यापूर्वी विरोधकांनी पळ काढला, मुख्यमंत्री म्हणाले…

गणपती ऊत्सवाच्या विसर्जनाच्या मिरवणुकीत सदा सरवणकर यांनी गोळी झाडल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. सरवणकर हे मुंबईच्या दादर भागातील आमदार आहेत. गणपती ऊत्सवाच्या विसर्जनाच्या मिरवणुकीत शिंदे गट व ठाकरे गट यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर काही काळ कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला होता.

यादाश कमजोर होना कोई बुरी बात नहीं; शेरेबाजीतून फडणवीसांचा विरोधकांना टोला

यानंतर विरोधी पक्षाकडून सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका करण्यात आली होती. सत्ताधारी पक्षाचे आमदारच जर अशा प्रकारे कायदा हातात घेत असतील सामान्य लोकांनी कुणाकडे बघायचे असा प्रश्न विरोधी पक्षनेते अजित पवारांनी उपस्थित केला होता. त्यावर आज सभागृहामध्ये फडणवीसांनी माहिती दिली आहे.

Exit mobile version