यादाश कमजोर होना कोई बुरी बात नहीं; शेरेबाजीतून फडणवीसांचा विरोधकांना टोला

यादाश कमजोर होना कोई बुरी बात नहीं; शेरेबाजीतून फडणवीसांचा विरोधकांना टोला

मुंबई : आज राज्याच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनाचा (Maharashtra Budget Session)शेवटचा दिवस आहे. आज विरोधकांनी अंतिम आठवडा प्रस्तावात अनेक प्रश्न उपस्थित केले. त्यानंतर अंतिम आठवडा प्रस्तावाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी(Devendra Fadnavis) उत्तर दिले. त्यावेळी फडणवीसांनी विरोधकांनाही टोले लगावले आहेत. यावेळी फडणवीस म्हणाले की, अंतिम आठवडा प्रस्तावाची सुरुवात विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी (Ambadas Danve)सुरुवात केली. यामध्ये प्रविण दरेकर, एकनाथ खडसे(Eknath Khadse), प्रसाद लाड, शशिकांत शिंदे, प्रज्ञा सातव यासह अनेक सदस्यांनी सहभाग घेतला. त्या सर्वांनी विविध प्रश्न उपस्थित केले आहेत. यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अनेक विषय आले आहेत. त्यामध्ये कायदा सुव्यवस्था, धारावी पुनर्वसन, छत्रपती संभाजीनगरमधील घरकूल योजनेचा विषय असे विविध विषय आहेत. यावेळी फडणवीसांनी शेरेबाजी करत विरोधकांवर टोलेबाजी केली. यावेळी फडणवीस म्हणाले की, काही विषय जुने आहेत काही विषय नविन आहेत. त्याचवेळी विरोधक दररोजच नवीन विषय कुठून आणतील असं म्हणत विरोधकांना टोलाही लगावला.

‘My Baby जैकलीन’…; जॅकलीनसाठी प्रियकराने जेलमधून लिहले प्रेमपत्र

यावेळी सभागृहात देवेंद्र फडणवीसांनी गुलजार यांचा एक शेर सांगितला, यादाश का कमजोर होना कोई बुरी बात नहीं जनाब, बहोत बेचैन रहते है वो लोग जिन्हे हर बात याद रहती है. अशा पद्धतीने शेरबाजी करत विरोधकांना टोला लगावला. त्यानंतर फडणवीस म्हणाले की, काही गोष्टी अशा मांडल्या आहेत की, मागील अडीच वर्षांना विसरुन सांगितल्या आहेत. त्यामुळे त्याची आठवणही करुन द्यावी असंही ते म्हणाले.

कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कायदा सुव्यवस्थेबद्दल अनेक प्रश्न आले आहेत. आणि हे खरं आहे की, सरकार बदलत असतात पण पोलीस तेच असतात. अनेकवेळा ते पोलीस चांगले काम करतात कधी ते चुकीचं काम करतात अशा अनेक गोष्टी आपल्यासमोर मांडल्या.

त्यात महत्त्वाचं काय असतं की, त्या पोलिसांना आपण नेतृत्व कसं देतो. शेवटी वरिष्ठांकडे पाहिले जाते त्यानंतर मंत्र्यांकडे पाहिले जाते. त्याठिकाणी पारदर्शकतेचा अभाव दिसला, कुठले वैयक्तिक हेतू साध्य करण्याचे प्रयत्न दिसला तर त्यातून अडचणी येतात.

आपण पाहिले असेल की, मागच्या काळात सचिन वाझेसारख्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचा शिरकाव झाला की काय होतं? मग ते उद्योजकांच्या घरासमोर स्फोटकं ठेवणं असेल किंवा बदल्यांमध्ये भ्रष्टाचार असतील, आता मी तेव्हाच्या गृहमंत्र्यांबद्दल बोलणार नाही असं म्हणत महाविकास आघाडीवर निशाणा साधला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube