‘My Baby जैकलीन’…; जॅकलीनसाठी प्रियकराने जेलमधून लिहले प्रेमपत्र

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 03 25T154939.001

बड्या उद्योगपतींकडून कोट्यवधींची खंडणी मागितल्याप्रकरणी तुरुंगात असलेल्या सुकेश चंद्रशेखरने अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसला तिच्या वाढदिवसानिमित्त दिल्लीच्या मंडोली तुरुंगातून पत्र लिहिले आहे. त्याने जॅकलिनला “माय बेबी जॅकलीन” असे संबोधून तिच्यावरील आपले प्रेम व्यक्त केले आणि सांगितले की त्याला त्याच्याभोवती ‘तिची ऊर्जा’ जाणवते. सुकेशच्या कोट्यवधी रुपयांच्या खंडणी प्रकरणात जॅकलीन फर्नांडिसची चौकशी करण्यात आली आहे.

सुकेशने लिहिले, “माझ्या बोम्मा, माझ्या वाढदिवसाच्या या दिवशी मला तुझी खूप आठवण येते, मला माझ्या सभोवतालची तुझी उर्जा जाणवते, माझ्याकडे शब्द नाहीत पण मला माहित आहे की तुझे माझ्यावरील प्रेम कधीही संपणार नाह. मला माहित आहे, तुझ्या सुंदर हृदयात काय आहे. मला पुराव्याची गरज नाही आणि माझ्यासाठी एवढेच महत्त्वाचे आहे बाळा, असे त्याने म्हटले आहे.

बिग बी ने मुलासाठी दिग्दर्शकासोबत केले होते भांडण

सुकेशने पुढे त्याच्या प्रेमाला “सर्वात मोठी भेट” म्हटले आहे. जे त्याच्या आयुष्यातील “अमूल्य” आहे. तिने लिहिले, “तुला माहित आहे की मी तुझ्या पाठीशी उभा आहे. लव्ह यू माय बेबी, मला तुझे ह्रदय देण्यासाठी धन्यवाद. मी माझ्या सर्व समर्थक आणि मित्रांचे आभार मानतो. माझ्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी मला शेकडो पत्रे, शुभेच्छा मिळाल्या आहेत, त्यासाठी मी धन्य आहे.

Akash Thosar म्हणतो… ‘सैराट’नंतर ‘यामुळे’ अनेक चित्रपट साईन केले नाही!

सुकेश याला मागच्या महिन्यात ईडीने रेलिगेयरचे माजी प्रमोटर मलविंदर सिंह याच्या पत्नीला फसवल्याप्रकरणी मनी लाँड्रींगच्या केसमध्ये अटक केली आहे. तसेच सुकेशशी संबंधित जॅकलीन फर्नांडीज व नोरा फेतेही या अभिनेत्रींची देखील चौकशी करण्यात आली आहे.

Tags

follow us