Download App

राज्यातील खासगी दूध संघांकडून शेतकऱ्यांवर दरोडा; सदाभाऊ खोतांची दुग्ध विकास मंत्र्यांकडं धाव

Sadabhau Khot : महाराष्ट्रातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष व शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले. त्या निवेदनामध्ये राज्यातील काही खासगी दूध संघांकडून दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अक्षरशः दरोडा टाकण्याचं काम सुरु असल्याचे निवेदनात म्हटले आहे.(Sadabhau Khot criticize On private milk unions meets Radhakrishna Vikhe Patil maharashtra Dairy farmers)

MIDC ची मागणी करतोय तर तुमच्या पोटात का दुखतं?, NCP कार्यकर्त्यांचा शिंदेना थेट सवााल

शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, महाराष्ट्रातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दूध दरामधील रिव्हर्स दर वाढीबाबत दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेतली.


राज्य सरकारने गाईच्या दुधाला 3/5 फॅट आणि 8/5 SNF ला 34 रुपये एवढा दर निश्चित केला आहे. त्याप्रमाणे दरपत्रक देखील जाहीर केलं आहे. परंतु काही खासगी दूध संघांनी 3/5 फॅट आणि 8/5 SNF च्या खाली ज्यांचे गुणप्रत असेल तर त्या दुधाला रिव्हर्स 1 रुपये ठेवलेला आहे.

उद्धव ठाकरेंचे तेच ते ‘डायलॉग’; स्क्रिप्ट बदलण्यासाठी भाजप आमदाराचं ठाकरेंना खास ‘गिफ्ट’

त्यामुळे राज्यातील काही खासगी दूध संघांनी शेतकऱ्यांवर जणू दरोडाच घातला आहे. पूर्वी 1 SNF व फॅटला 30 पैसे कमी होत होते. परंतु काही खासगी दूध संघाकडून चालू दरवाढीमध्ये कमी गुणप्रतीला 1 रुपया दाखविलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे SNF व फॅट्स ही 3/5, 8/5 पेक्षा कमी लागल्यास शेतकऱ्यांना खूप कमी दराने दूध विक्री करावी लागत आहे.

अर्थातच त्यामुळे शेतकरी पुन्हा अडचणीत येत आहे. म्हणून SNF आणि फॅट्समध्ये पूर्वीचाच 30 पैसे हा दर असावा, अशी मागणी आज दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे यांची भेट घेऊन केली आहे.

तसेच सर्व खासगी आणि सहकारी दूध संघाचे दूध गुणवत्ता प्रत तपासणी यंत्र (लॅक्टोमीटर) याची देखील तात्काळ तपासणी करण्यात यावी, अशी मागणी देखील याप्रसंगी लावून धरली. यावर दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही सकारात्मकता दाखवली असल्याचे आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.

Tags

follow us