शरद पवारांच्या राष्ट्रवादीला पुन्हा धक्का, बडा नेता भाजपात प्रवेश करणार

हे सगळ वातावरण सुरु होत असतानाच शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ऐन जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

News Photo   2026 01 18T184440.981

शरद पवारांच्या राष्ट्रवादीला पुन्हा धक्का, बडा नेता भाजपात प्रवेश करणार

महापालिका निवडणुकीत भाजपा आणि शिंदे सेनेच्या युतीला मोठं यश मिळालं. (NCP) मात्र, पुण्यासह राज्यात अनेक ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला फारसं यश मिळवता आलं नाही. राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीचा निकाल नुकताच १६ जानेवारी रोजी जाहीर झाला. त्यामध्ये पुण्यात तर दोन्ही राष्ट्रवादीला पराभवाचा धक्का बसला आहे. महापालिका निवडणुकीनंतर आता राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा घडामोडींना वेग आला आहे.

हे सगळ वातावरण सुरु होत असतानाच शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ऐन जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते समरजितसिंह घाटगे हे लवकरच भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. समरजितसिंह घाटगे यांनी त्यांच्या सोशल मीडियावरून ‘तुतारी’ देखील हटवली आहे. त्यामुळे समरजितसिंह घाटगे हे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्ष सोडणार असल्याची चर्चा सुरू झाली. या चर्चांवर आता भारतीय जनता पक्षाचे नेते तथा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मोठं भाष्य केलं आहे. ‘समरजितसिंह घाटगे यांच्या भाजपा प्रवेशाची फक्त टेक्निकल बाब राहिली आहे, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

मी त्या हॉटेलमध्ये जेवायला जाणार, संजय राऊतांच्या एका वाक्याने शिंदेंच्या गोटात प्रचंड खळबळ

मंत्री चंद्रकांत पाटील काय म्हणाले?

समरजितसिंह घाटगे हे पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाच्या आणि महायुतीच्या ब्रॉड कोल्डमध्ये आलेले आहेत. पक्षप्रवेश नावाची टेक्निकल गोष्ट देखील होईल. ते आमच्या मांडीला मांडी लावून बसले होते. आता पुन्हा त्यांची वाटचाल आमच्या बरोबर होईल. समरजितसिंह घाटगे हे पुन्हा भाजपात प्रवेश करून भाजपाचा नेता होणार, पण पक्ष प्रवेश ही टेक्निकल गोष्ट राहिली आहे, ती होईल”, असं मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

समरजितसिंह घाटगे यांचा भाजपा कधी प्रवेश होणार? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, “उद्या देखील पक्ष प्रवेश होईल, माहिती नाही. पण आता हे ठरलं आहे की त्यांचे कार्यकर्ते जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत कमळ चिन्हावर लढवतील”, असं चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान समरजितसिंह घाटगे यांनी भारतीय जनता पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर समरजितसिंह घाटगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडून कागलमधून विधानसभेची निवडणूक लढवली होती. मात्र, त्या निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं होतं.

Exit mobile version