Download App

आरक्षण मागायचे नाही तर देश चालवायचा; मुंडेंचे कान टोचताना भिडेंचा मराठा समाजाला सल्ला

Sambhaji Bhide यांनी धनंजय मुंडेंचे देखील कान टोचले आणि मराठा समाजाला केवळ आरक्षण मागणे हा संकुचित विचार करू नये असा सल्ला दिला.

Sambhaji Bhide on Maratha Reservation while talk on Dhananjay Munde : मराठ्यांनी आरक्षण मागायचे नाही तर देश चालवायचा मराठा समाजाला आवण कोण आहोत हे कळत नाही हे दुर्दैव आहे. त्यांना आपण कोण आहोत हे कळलं तर देशाचे कल्याण होईल. असं वक्तव्य शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे प्रमुख संभाजी भिडे यांनी केलं. यावेळी त्यांनी धनंजय मुंडेंचे देखील कान टोचले आहेत.

औरंगजेबाच्या विचाराला थारा नाही…, अबू आझमीच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी संतापली

धनंजय मुंडे यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा (Dhananjay Munde Resignation) सुपूर्द केला. राजीनामा स्वीकारल्याचे फडणवीसांना जाहीरही केले. यानंतर विरोधकांनी धनंजय मुंडेवर (Dhananjay Munde) टीकेची झोड उठवली आहे. त्यात संभाजी भिडे यांनी धनंजय मुंडेंचा उल्लेख करत मराठा समाजाला केवळ आरक्षण मागणे हा संकुचित विचार करू नये असा सल्ला दिला.

अर्रर्र… आजही रोहितचं बॅडलक, सलग 11 व्यांदा गमावला टॉस, केली ‘या’ खेळाडूची बरोबरी

यावेळी बोलताना भिडे म्हणाले की, धनंजय मुंढे जे काय वागतायत त्यांनी संभाजी महाराज शिवाजी महाराज, शहाजी राजे यांचे चरित्र वाचावे मराठ्यांचा इतिहास पाहावा मराठ्यांनी आरक्षण मागायचे नाही तर देश चालवायचा मराठा समाजाला आवण कोण आहोत हे कळत नाही हे दुर्दैव आहे. त्यांना आपण कोण आहोत हे कळलं तर देशाचे कल्याण होईल.

तर याच वेळी त्यांनी आताचे त्रिमूर्तीचे शासन आहे. त्यांची बुद्धी चालणार नाही पहिल्यांदाच हे तिघे एकत्र आले आहेत ही जमेची बाजू आहे. असं म्हणत सरकारला देखील सुनावले आहे.

follow us