Download App

Gautami patil ने ‘पाटील’ आडनाव लावावं का? संभाजीराजे म्हणतात…

Sambhajiraje Chhaytrapati on Gautami patil : आपल्या नृत्याने आणि अदाकारीने लोकांना घायाळ करणारी गौतमी पाटील (Gautami patil Video) नेहमीच लोकांच्या चर्चेत राहिली. तसेच आपल्या नृत्याने सर्वांना घायाळ करणारी गौतमी पाटील (Gautami Patil) वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. तिच्या आडनावावरुन सध्या जोरदार वाद निर्माण झाला आहे. (Shahir Sambhaji Bhagat) गौतमीमुळे पाटील आडनावाची बदनामी होते. त्यामुळे तिने पाटील अडनाव वापरु नये, अशी मागणी मराठा संघटनांकडून करण्यात येत आहे.

Pre-wedding shooting विरोधात मराठा सेवा संघाचा ठराव, वधू-वर मेळाव्यात उचललं पाऊल

यावर आता थेट संभाजीराजे छत्रपती यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, ‘महिलांनी आपले गुण व कृतृत्व दाखवायालव पाहिजे. त्यासाठी सर्वांनी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहायला हवे. तसेच पाटील हे आडनाव मराठा समाजातच नाही तर अनेक समाजामध्ये लावले जाते. ते आडनाव नसून तो एक किताब आहे. त्यामुळे तो अनेक समाजाला मिलालेला असलेल्याने ते आडनाव म्हणून लावले जाते. त्यामुळे कालाकारांना सुरक्षा मिळाली पाहिजे.’ असं मत संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केलं आहे. ते जळगावमध्ये बोलत होते.

Wrestlers Protest : आमच्यावर सात तासांत एफआयआर अन् बृजभूषणविरोधात मात्र… सुटकेनंतर बजरंग पुनिया पुन्हा आक्रमक

दरम्यान गौतमी पाटीलसाठी केलेली किरण माने यांच्या पोस्टची देखील मोठी चर्चा सुरु झाली आहे. तसेच गौतमी पाटीलला त्यांनी दिलेल्या पाठिंब्याचे गौतमीच्या चाहत्यांनी त्यांचे मोठ्या प्रमाणात कौतुक केले आहे. गौतमीने आजवर अनेकदा माध्यमांसमोर आपल्या खाजगी आयुष्यावर काही प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. गौतमीने तिचे जन्मगाव मूळ धुळे सिंदखेडा येथील असून वय २५ असल्याचे सांगितले एका मुलाखतीमध्ये सांगितले होते.

Tags

follow us