Wrestlers Protest : आमच्यावर 7 तासांत एफआयआर अन् बृजभूषणविरोधात मात्र… सुटकेनंतर बजरंग पुनिया पुन्हा आक्रमक

Wrestlers Protest : आमच्यावर 7 तासांत एफआयआर अन् बृजभूषणविरोधात मात्र…  सुटकेनंतर बजरंग पुनिया पुन्हा आक्रमक

Bajrang Punia Agressive After Released : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजपचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह (Brijbhushan Sharan Singh) यांच्याविरोधात दिल्लीच्या जंतरमंतरवर निदर्शने करणाऱ्या कुस्तीपटूंना पोलिसांनी आज दुपारी ताब्यात घेतले होते. त्यापैकी साक्षी मलिक, संगीता फोगट आणि विनेश फोगट या महिला कुस्तीपटूंची सुटका करण्यात आली होती. तर बजरंग पुनिया अद्याप पोलिसांच्या ताब्यात होता. त्यानंतर मध्यरात्री त्याची सुटका करण्यात आली. सर्व पैलवानांना पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी बंदोबस्तात ठेवले होते.

साक्षी मलिक, संगीता आणि विनेश फोगटची सुटका, बजरंग पुनिया अजूनही कोठडीत

सुटकेनंतर बजरंग पुनिया पुन्हा आक्रमक झाला आहे. त्याने बृजभूषणसिंह तसेच एफआयआरवरून पोलिसांवर निशाणा साधला आहे. तो म्हणाला की, ‘आपल्या देशाचं दुर्दैव आहे की, महिला खेळाडूंच लैंगिक शोषण करणारे आरोपी बृजभूषणसिंह संसदेच्या उद्घाटलाना उपस्थित होते. त्याचबरोबर आमच्यावर सात तासांत एफआयआर दाखल करण्यात आले. मात्र बृजभूषणविरोधात एफआयआर दाखल करण्यासाठी सात दिवस लागले. त्याचबरोबर अद्यापही त्यांना अटक करण्यात आलेली नाही.’ अशी टीका पुनियाने केली आहे.

वांद्रे समुद्र सेतूला ‘स्वांतत्र्यवीर सावरकरांचं नाव, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

23 एप्रिलपासून देशातील अनेक कुस्तीपटू ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी यासाठी जंतरमंतरवर आंदोलन करत होते. एका अल्पवयीन महिला कुस्तीपटूंसह सात महिला कुस्तीपटूंवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी ब्रिजभूषण शरण सिंग यांच्या अटकेसाठी कुस्तीपटूंचे आंदोलन सुरु होते.

IPL 2023 Final CSK vs GT : IPL च्या अंतिम सामन्यावर पावसाने फिरवले पाणी, राखीव दिवशी होणार सामना

आज, 28 मे रोजी, नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाच्या दिवशी कुस्तीपटूंची येथे ‘महिला सन्मान महापंचायत’ होणार होती. जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या पैलवानांनी शांततेत मोर्चा काढणार असल्याचे सांगितले होते. मात्र, पोलिसांकडून जंतरमंतरवरच पैलवानांना थांबवण्यात आले. कुस्तीपटूंना रोखण्यासाठी दिल्ली पोलिसांनी मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात केला होता. ठिकठिकाणी बॅरिकेडिंगही लावण्यात आले होते.

सावरकरांचा हिंदुत्वाचा विचार लोकप्रिय झाला तर… मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर निशाणा

मोर्चा काढण्यासाठी कुस्तीपटूंनी पोलिसांचे बॅरिकेड्स ओलांडण्याचा प्रयत्न केला. नवीन संसद भवनाकडे जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या कुस्तीपटूंना पोलिसांनी फरफटत नेले. यामध्ये विनेश फोगट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांच्यासह सर्व कुस्तीपटूंना पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले होते. दरम्यान, दिल्ली पोलिसांनी कुस्तीपटूंच्या जंतरमंतरवरील सर्व तंबू देखील हटवले आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube