Download App

बसमधील प्रवाशांची नावं आली समोर ; 26 जणांचा मृत्यू 8 सुखरुप…. बसचा केवळ सांगाडाच उरला…

Samruddhi Highway Bus Accident News: : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर खासगी प्रवासी बसचा अपघात होऊन 26 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. बुलढाण्यात सिंदखेडराजा जवळील पिंपळखुटा फाट्यावर मध्यरात्री दीडच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. प्राथमिक माहितीनुसार बस डिव्हायडरला धडकून डिझेल टँक फुटल्याने बसने पेट घेतला आणि 26 जणांचा होरपळून मृत्यू झाला. (Samruddhi highway Vidarbha travels bus accident Buldhana 26 died)

निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विदर्भ ट्रॅव्हल्सची बस क्रमांक MH-29-BE-1819 ही बस नागपूरहून पुणेच्या दिशेला निघाली होती. बसमध्ये 30 प्रवासी आणि ट्रॅव्हल्सचे 3 कर्मचारी होते. यातील 26 जणांचा मृत्यू झाला तर 8 प्रवासी सुखरुप आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांच्यासह सिंदखेड राजा, किनगाव राजासह लगतच्या पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी पोहोचले आहेत. त्याचबरोबर घटनास्थळी पाच ते सहा रुग्णवाहिका दाखल झाल्या आहेत.

दरम्यान, मृतांमध्ये 3 लहान मुलांचाही समावेश असल्याची माहिती आहे. मध्यरात्रीची वेळ असल्याने प्रवासी झोपलेले होते. त्यातच अचानक या सर्व गोष्टी घडल्याने प्रवाशांना बसमधून बाहेर पडता आले नाही. त्यामुळे मोठी जीवितहानी झाली. लागलेली आग एवढी भयंकर होती की फक्त बसचा फक्त सांगाडा शिल्लक राहिला आहे.

अपघात नेमका कसा झाला?

बसमधील बचावलेल्या प्रवाशांनी ABP माझाशी बोलताना या अपघाताची माहिती दिली आहे. “आम्ही रात्री जेवण करुन बसमध्ये बसलो होतो. त्यानंतर दिड ते दोन तासानं बस रस्त्याच्या दुभाजकाला धडकली आणि बस पलटी झाली. पलटी झाल्यानंतर टायर घासल्याने आणि डिझेल टँक फुटल्याने बसने लगेच पेट घेतला. बस पलटी झाल्यानंतर आम्ही खाली पडलो, त्यानंतर आम्ही बसची वरची खिडकी तोडली आणि त्यातून बाहेर पडल्याचे प्रवाशांनी सांगितले. पण आग एवढी भयंकर लागली होती की, काही वेळातच संपूर्ण बसने पेट घेतल्याची माहिती प्रवाशांनी सांगितली.

Tags

follow us