Sanajay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( Sanajay Raut) यांनी दिल्लीतील शेतकरी आंदोलनावकरून भाजप आणि पंतप्रधान मोदींवर (PM Modi) जोरदार निशाणा साधला. राऊत म्हणाले की, भाजप हा फुगलेला बेडूक आहे. तो कधीच बैल होणार नाही. जे शेतकरी दिल्लीच्या दिशेने निघाले आहेत, त्यांना तुम्ही वेडे समजत आहात का? असा सवाल देखील राऊत यांनी केला. ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते.
राऊत म्हणाले की, प्रधानमंत्री मोदी परदेश दौऱ्यावर आहेत. त्यांनी एका मंदिराचे उद्घाटन त्यांनी केलं. मात्र दुसरीकडे या देशात अनेक गंभीर प्रश्न निर्माण झालेले आहेत. शेतकरी दिल्लीच्या दिशेने लाखोच्या संख्येने कुच करत आहे. हमीभावासाठी शेतकरी देशाच्या राजधानीकडे येत आहे आणि त्यांना रोखण्यासाठी दिल्लीच्या सीमेवर अश्रुधूराच्या नळकांड्या फोडल्या जात आहेत. पाण्याचे फवारे मारले जात आहेत, पोलीस गोळीबारासाठी सज्ज आहेत ,रस्त्यावर खिळे ठोकलेले आहेत वाहने जाऊ नये म्हणून. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिशांनी सुद्धा अशा प्रकारची दमण शाही केली नव्हती, ती दमनशाही मोदी सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत करत आहे.
निवडणुकांच्या तोंडावर राजकीय पक्षांना मोठा धक्का; ‘इलेक्टोरल बॉण्ड्स’ योजना SC ने फेटाळली
तसेच मोदी सरकार आता शेतकऱ्यांवर गोळीबार करण्याच्या मनस्थितीत आहे. ही एक प्रकारची झुंडशाही आहे. स्वामीनाथनला तुम्ही भारतरत्न देता, स्वामीनाथन यांनी शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा अशी मागणी केली होती. हेच मोदी 2014 पासून सांगत आहेत. शेतकऱ्यांचे उत्पादन दुप्पट केलं जाईल, पण शेतकरी आंदोलन करतो आहे त्यांना तुम्ही रोखत आहात. लवकरच उद्धव ठाकरे एक पत्रकार परिषद शेतकऱ्यांच्या आंदोलनासंदर्भात घेऊन आपली भूमिका स्पष्ट करतील. दिल्लीतल्या शेतकऱ्यांच्या बाबतीतल्या भूमिकेच्या संदर्भात आम्ही निषेध व्यक्त करतो. भाजप हा फुगलेला बेडूक आहे. तो कधीच बैल होणार नाही. जे शेतकरी दिल्लीच्या दिशेने निघाले आहेत, त्यांना तुम्ही वेडे समजत आहात का? असा सवाल राऊत यांनी केला आहे.
पुढे राऊत म्हणाले की, शेतकऱ्यांची मागणी काय आहे? त्यांची मागणी शेतमालाला हमीभाव द्यावा. मोदी सरकारने जी वचने दिलेली आहे. उत्पन्न दुप्पट करायचं मागच्या आंदोलनात त्यांना खलीस्थानी केलं होतं. आता त्यांना तुम्ही माओवादी ठरवलं आहेत कधीतरी या विचारांचा स्पोर्ट होईल. अनेक ठिकाणी मोदी गॅरेंटी देत आहेत पण स्वतः मोदींची गॅरंटी नाही.याची तुम्हाला मी माझ्या पक्षाच्या वतीने गॅरेंटी देतो. ती गॅरंटी नसल्यामुळे प्रत्येक पक्षातील प्रमुख लोकं फोडून कशा जागा मिळवाव्यात ही त्यांची भूमिका आहे. असं राऊत म्हणाले आहेत.