अंबादास दानवे यांनी हप्त्या संदर्भातील यादीत नावासहित रेट टाकले, त्यांना रेट कसे माहित? याचा अर्थ त्यांचा त्यात हात आहे. मी पालकमंत्री असून मला रेट माहित नाही. त्यांना माहित आहे म्हणजे ते त्याच्या माहित आहेत का? का असा सवाल मंत्री संदीपान भुमरे यांनी अंबादास दानवे यांना विचारला आहे. ते पुढे म्हणाले की अंबादास दानवे यांना उद्धव ठाकरे यांना खुश ठेवायचे म्हणून ते सतत माझ्यावर आरोप करत आहेत. अशी टीका त्यांनी केली.
संभाजीनगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवणुकीची आज अर्ज परत करण्याची शेवटचा दिवस होता. या निवडणूकीत शिवसेना भाजप युतीच्या पॅनलची आज भाजप नेते हरिभाऊ बागडे आणि संदीपान भुमरे यांनी घोषणा केली. त्यांनी निवडणुक उमेदवाराची घोषणा केली आणि पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर दिली.
छत्रपती संभाजीनगर बाजार समितीमध्ये निवडणूकीत एकूण 15 उमेदवार त्यांनी जाहीर केले. यात भाजप 11, शिवसेनेचे 4 उमेदवार आहेत. तर हरिभाऊ बागडे नानाच्या नेतृत्वाखाली पॅनल निवडून येणार अशी आशा संदीपान भुमरे यांनी व्यक्त केल्या. छत्रपती संभाजीनगर कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकरी विकास पॅनल असे आमच्या पॅनलचे नाव असणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.
Market Committee Election : राहुरी बाजार समितीचं चित्र स्पष्ट, भाजप-मविआमध्ये सरळ लढत
अंबादास दानवे यांन पोलिसांमुळे दंगल घडली असा आरोप केला होता. त्यावर देखील भुमरे यांनी उत्तर दिले. ते म्हणाले की पोलीसामुळे कुठे दंगल घडत असते का? त्यांनी दंगल आटोक्यात आणली, आपला जीव धोक्यात घालून त्यांनी तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यावर असे आरोप करणे चुकीचे आहे.
अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषद घेऊन आरोप केले होते की शहरात पोलीस हप्ते घेतले जात असल्याचं सांगत त्यांनी रेट कार्ड जाहीर केले होते, त्यावर पालकमंत्री म्हणून संदीपान भुमरे यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले कि विरोधी पक्षनेते बेछुड आरोप करत आहेत. सगळ्यात जास्त ते पोलीसणांवर आरोप करत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या सभेला गर्दी झाली नाही म्हणून ते पोलिसांवर आरोप करत असल्याची टीका त्यांनी केली.
‘त्या शंका-कुशंका…’ बंडाच्या चर्चांवर अजित पवार पुन्हा म्हणाले…