Download App

अजित दादांच्या चर्चेला आमदार संग्राम जगताप यांची दांडी…अहिल्यानगरचे राजकारण तापणार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे त्यांचाच पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांच्या विरोधात तक्रार केली आहे.

  • Written By: Last Updated:

MLA Sangram Jagtap : विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी हिंदुत्ववादी भूमिका स्वीकारली. जगताप यांनी गेल्या अनेक दिवसांपासून मुस्लिम समाजाविरोधात वक्तव्य केल्याचा आरोप आता खुद्द त्यांच्याच पक्षातील नेत्यांकडून केला जातो आहे. यामुळे आता याबाबत अजित पवार यांनी थेट भाष्य केले आहे. (Jagtap) आपण संग्राम जगताप यांना मुंबईमध्ये बोलावले आहे. त्यांच्याशी याबाबत चर्चा जाणून घेणार आहोत असं अजित पवार म्हणाले होते. मात्र आज मुंबईमध्ये होणाऱ्या राष्ट्रवादीच्या आमदारांच्या बैठकीला जगताप यांनी दांडी मारली असल्याची माहिती समजते आहे. यामुळे आता यावर अजित पवार काय भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे आहे.

जगतापांविरोधात थेट अजित पवारांकडे तक्रार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे त्यांचाच पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांच्या विरोधात तक्रार केली आहे. पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सलीम सारंग यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांना तक्रार करणारं पत्र पाठवलं आहे. जगताप यांच्याकडून मुस्लिम समाजाबाबत वादग्रस्त वक्तव्यं केली जात आहेत. त्यांना वेळीच आवरलं नाही तर मुस्लिम समाज विरोधात जाण्याची शक्यता पत्रातून वर्तवण्यात आली होती.

औरंगजेबाचे थडगे काढलेच पाहिजे; अहिल्यानगरमध्ये आमदार संग्राम जगताप कडाडले

यावर बोलताना अजित पवार म्हणाले, संग्राम जगताप यांनी घेतलेली भूमिका यावर चर्चा करण्यासाठी मी बोलावले आहे. याबाबत मी चर्चा करणार आहे. हि आमच्या पक्षाची भूमिका नाही नसून आपल्या पक्षाची भूमिका हि धर्मनिरपेक्ष आहे. सर्वधर्म समभाव अशी आपल्या पक्षाची भूमिका आहे. मात्र जगताप असे का बोलत आहे यावर मी त्यांच्याशी चर्चा करणार आहे. जगताप यांचे काय समाज गैरसमज झाले आहे हे जाणून घेणार आहे. तसेच ते दूर करणार आहे. आपण शाहू फुले आंबेडकर यांना मानणारे असून त्यांचे विचार आपण आत्मसात करत असतो. या विचाराने आपण पुढे जाणार अशी थेट भूमिका यावेळी अजित पवार यांनी मांडली आहे.

दादांच्या बैठकीला जगतापांची दांडी

राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आमदारांची आज बैठक पार पडली. या बैठकीला संग्राम जगताप यांना बोलावण्यात आले होते . याबाबत अजित पवार यांनी थेट माध्यमांसमोर सांगितले होते. पवारांनी बोलावूनही जगताप यांनी बैठकीला दांडी मारली आहे. दरम्यान संग्राम जगताप हे मतदार संघातच आहे. आषाडीवारीच्या ज्या दिंड्या आल्या आहेत या कार्यक्रमांना उपस्थिती लावली असल्याने जगताप हे बैठकीला गेले नसल्याची माहिती समजते आहे. दरम्यान संग्राम जगताप यांच्या मनात नेमकं काय आहे? त्यांची हिंदुत्ववादी भूमिका बाबत आता अजित पवार काय भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे आहे.

follow us