…म्हणूनच ‘गणराया’वर अंडी फेकण्याचं धाडस; आमदार जगतापांचा ठाकरेंवर प्रहार

'बाळासाहेबां'ची विचारधारा सोडली म्हणून 'गणराया'वर अंडी फेकण्याचं धाडस झाल्याचा प्रहार आमदार जगताप यांनी उद्धव ठाकरेंवर केला आहे.

Udhav Thackeray

Mla Sangram Jagtap On Udhav Thackeray : मुंबईत गणेश आगमन सोहळ्यादरम्यान गणरायाच्या मूर्तीवर 32 व्या मजल्यावरून अंडे फेकल्याच्या कथित घटनेवरुन आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांच्यावर जोरदार निशाणा साधला. बाळासाहेब ठाकरे असते तर अशा घटना घडल्या असत्या का? असा सवाल उपस्थित करत काही लोकांनी बाळासाहेबांची विचारधारा सोडून केवळ मतांच्या राजकारणासाठी भूमिका बदलल्याचा टोला जगताप यांनी लगावला. चिचोंडी पाटील येथील पावन गणेश मंदिरात अंगारक संकष्ट चतुर्थीनिमित्त आयोजित आरतीच्या कार्यक्रमात जगताप बोलत होते.

रितेश देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘पाच फुटाचा बच्चन’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच ; 9 ऑक्टोबरला रुपेरी पडद्यावर झळकणार

पुढे बोलताना आमदार जगताप म्हणाले, मुंबईतील गणेश आगमन सोहळ्याचा संदर्भ देताना ते म्हणाले, गणरायाची मूर्ती घेऊन येत असताना 32 व्या मजल्यावरून मूर्तीवर अंडे फेकण्याचे धाडस काही लोकांना कसे झाले? हा प्रश्न आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची मुंबई म्हणून ओळख असलेल्या शहरात असा प्रकार घडणे ही दुर्दैवी बाब आहे. भगव्या टोप्या-पंच घालणारे आपल्या सोबत आहेत असा संदेश गेल्यानेच धाडस वाढले. काही लोकांनी बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा सोडून भूमिका बदलल्यानेच अशा प्रवृत्तींचे धाडस वाढले असल्याचा आरोप जगताप यांनी केला. भगव्या टोप्या किंवा भगवे पंच घालणारे लोक आपल्यासोबत आहेत, असा संदेश काहींना मिळाल्यामुळेच अशा घटना घडण्याचे धाडस होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

जगताप यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला ;बाळासाहेब असते तर हे घडले असते का? बाळासाहेब ठाकरे आज असते तर अशा घटना घडल्या असत्या का?’ असा थेट सवाल उपस्थित करत जगताप यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. मतांच्या राजकारणासाठी भूमिका बदलल्यानेच परिस्थिती बिघडत असल्याचे ते म्हणाले. निवडणुका येतात-जातात, राजकीय लोक येतात-जातात आणि राजकारणही बदलत राहते.

मात्र, भविष्यात सुरक्षित राहायचे असेल तर समाजात निर्माण होत असलेल्या काही प्रवृत्तींबाबत सतर्क राहण्याची गरज असल्याचे जगताप यांनी सांगितले.दरम्यान, मुंबईतील गणेश आगमन सोहळ्यात घडल्याचा आरोप असलेल्या या घटनेच्या पार्श्वभूमीवर जगताप यांनी जिहादी विचारांचे पाऊल पडत आहे असा उल्लेख करत समाजाने सतर्क राहण्याचे आवाहन केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यावरील राजकीय टीकेला अधिक धार आली आहे.

follow us