Sangram Thopte Press Conference : काँग्रेस पक्ष सोडून जाताना दु:ख होत असलं तरी कार्यकर्त्यांची भावना होती की आपण निर्णय घेतला पाहिजे. आम्हाला डावललं जात होत. त्यावेळीही कार्यकर्ते आक्रमक होत होते की आपण आता निर्णय घेण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आता शेवटी विचार केला आहे की, कार्यकर्त्यांसाठी आणि तालुक्याच्या (Thopte) विकासासाठी आपण काही निर्णय घेतले पाहिजेत. तसंच, ज्या ठिकाणी तुम्ही निष्ठेने राहता त्या ठिकाणी त्याचा सन्मान राहत नसेल तर आपण निर्णय घेतला पाहिजे असं म्हणत संग्रा थोपटे यांनी अखेर काँग्रेसा सोडचिठ्ठी दिली आहे. ते आता भाजपमध्ये जाणार आहेत. परवा २२ एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत प्रवेश होणार असल्याचं बोललं जात आहे.
संग्राम थोपटे हे तीन वेळेस आमदार राहिले आहेत. त्यांना मंत्रिपदाची अपेक्षा होती. मात्र, महाविकास आघाडीकडून ती पूर्ण झाली नाही. संग्राम थोपटे हे अनंतराव थोपटे यांचे चिरंजीव आहेत. अनंतराव थोपटे यांनी काँग्रेसकडून 14 वर्ष मंत्रिपद भूषवलं होतं. अनंतराव थोपटे हे भोर विधानसभा मतदारसंघाचे 6 वेळेस आमदार झाले होते. त्यांनी राज्याच्या मंत्रिमंडळात 14 वर्षे मंत्री म्हणून काम केलं होतं.
काही लोकांना दोन्ही भाऊ अन् समविचारी पक्ष एकत्र..राऊतांनी ठाकरे बंधू एकत्र येण्यावर फोडला बॉम्ब
थोपटे घराण्याने भोर तालुक्यात 40 वर्षांपेक्षा जास्त काळ सत्ता उपभोगली आहे. अनेक राजकीय विश्लेषक भोर म्हणजे थोपटे आणि थोपटे म्हणजे भोर असंही म्हणायचे. मात्र, 2024 च्या विधानसभा निवडणुकीत थोपटे घराण्याला सर्वात मोठा हादरा बसलाय. संग्राम थोपटे यांना विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागलाय. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते शंकर मांडेकर यांनी संग्राम थोपटे यांचा पराभव केलाय.
या निवडणुकीत शंकर मांडेकर यांनी 126,455 मतं मिळवली तर संग्राम थोपटेंना 106,817 मतांवर समाधान मानावं लागले. त्यामुळे शंकर मांडेकर यांनी थोपटे घराण्याची 40 वर्षांची सत्ता उलथून लावलीये. मात्र, पराभव होताच संग्राम थोपटेंनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतलाय. दरम्यान, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत संग्राम थोपटे यांनी सुप्रिया सुळेंचा जोरदार प्रचार केला होता. शरद पवारांनी सुप्रिया सुळे यांना निवडून आणण्यासाठी संग्राम थोपटे यांचे वडिल अनंतराव थोपटे यांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या.