कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर आम्हाला ठामपणे… बारामतीत पुन्हा काका विरुद्ध पुतण्या सामना रंगणार

कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर आम्हाला ठामपणे… बारामतीत पुन्हा काका विरुद्ध पुतण्या सामना रंगणार

Yugendra Pawar : बारामतीत पुन्हा काका विरुद्ध पुतण्या अशी लढत पाहायला मिळणार आहे. आमच्याकडे ना संस्था आहेत, ना सत्ता ना पैसा आहे. तरीही पक्षफूटीनंतर कार्यकर्ते सोबत राहतात ही सोपी गोष्ट नाही. (Yugendra Pawar) कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर आम्हाला ठामपणे त्यांच्यामागे उभं राहावं लागेल. सक्षम उमेदवार मिळत असतील तर आणि माळेगावचा छत्रपती होवू द्यायचा नसेल, तर निवडणूक लढवावी लागेल, असं मत राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार गटाचे युवा नेते युगेंद्र पवार यांनी व्यक्त केले. बारामतीत ते पत्रकारांशी बोलत होते.

शरद पवार यांच्या बारामती दौऱ्यात शनिवारी माळेगावचे काही सभासद त्यांना भेटले. याविषयी युगेंद्र पवार यांना विचारणा केली असता ते म्हणाले, शरद पवार यांच्याकडे सभासद नेहमीच वेगवेगळे प्रश्न घेवून येत असतात. माळेगावचे अध्यक्ष केशवराव जगताप यांनी आंदोलनावर केलेल्या टीकेचा युगेंद्र पवार यांनी समाचार घेतला. ते आंदोलन आमच्या पक्षाचे नव्हते तर आंदोलनाला आम्ही पाठींबा दिला होता. सर्वपक्षीय सभासद आंदोलनात होते. त्यात माळेगावच्या अध्यक्षांनी राजकारण आणू नये, असे युगेंद्र पवार म्हणाले.

Yugendra Pawar: तो क्षण माझ्यासाठी आयुष्यातील सर्वात मोठा होता, पहिल्या सभेत युगेंद्र पवार काय म्हणाले?

कामगारांना पगार वेळेवर मिळत नाहीत, रसायनयुक्त पाणी नदीत सोडले जात आहे. ऊसाला योग्य दर दिलेला नाही. कधी तरी एकदा चांगला दर दिला तेच सातत्याने सांगितले जात आहे. मग छत्रपतीनेही १५ वर्षांपूर्वी चांगला दर दिला होता, तेच सांगायचे का, असा सवाल युगेंद्र यांनी केला. माळेगावच्या कार्यक्षेत्रातील खांडज ग्रामपंचायतीने दुषित पाण्यासंबंधी ठराव केला आहे. मी तेथे भेट दिली. दुषित पाणी शेतीला दिल्याने, पिल्याने कर्करुग्ण वाढत आहेत.

मासे मृत्यूमुखी पडत आहेत. शेतकऱ्यांचे टनेज घटत आहे, असं ते म्हणाले. माळेगावचे अध्यक्ष माझ्या शरयू कारखान्याच्या दराबाबत बोलले. माझा कारखाना ज्या तालुक्यात आहे, तिथे आम्ही क्रमांक एकचा दर देतो. तो सहकारी नव्हे तर खासगी कारखाना आहे. कर्ज काढून मी तो कष्टाने चालवत आहे. त्यांचे (केशवराव जगताप यांच्या नेत्यांचे) सात-आठ खासगी कारखाने आहेत. मी जर बोलायला लागलो तर मग त्यांना ते जड जाईल असंही ते यावेळी म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube