Video : लोकसभेला अजित पवारांची चूक अन् विधानसभेला आमची; युगेंद्र पवार यांचा मोठा खुलासा

Video : लोकसभेला अजित पवारांची चूक अन् विधानसभेला आमची; युगेंद्र पवार यांचा मोठा खुलासा

Yugendra Pawar on Ajit Pawar : महाराष्ट्र विधनसभा 2024 ला सर्वात जास्त चर्चेत आणि गाजली ती निवडणूक म्हणजे बारामती मतदारसंघातील विधानसभा निवडणूक. येथून एक नवीन काका पुतण्याची जोडी एकमेकांना आव्हान देत होती.  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार आणि त्यांच्या विरोधात त्यांचेच पुतणे शरद पवार गटाकडून युगेंद्र पवार (Yugendra Pawar) हे निवडणुकीच्या रिंगणात होते. अखेर, या लढाईत युगेंद्र पवार यांचा पराभव झाला आणि अजित पवार विजयी झाले. मात्र, या निवडणुकीनंतर पहिल्यांदाच युगेंद्र पवार यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीतला मोठा निर्णय घेतला आहे. ते लेट्सअप मराठीवर बोलत होते.

बारामती विधानसभा निवडणुकीची लढाई तशी कठीणच होती. ती लढाई कठीण आहे हे मला तेव्हाही कळत होतं. मात्र, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या अस्तित्वासाठी मी ती लढाई लढलो. परंतु, यानंतर मी उपमुख्यमंत्री आणि माझे काका अजित पवार यांच्याविरूद्ध निवडणूक लढवणार नाही अशी थेट घोषणाच युगेंद्र पवार यांनी लेट्सअप मराठीवर बोरताना केली आहे. त्याचबरोबर राजकारण हे खूप मोठ्या प्रमाणावर बदललं आहे. त्यामुळे राजकारणात कधीही आणि काहीही होऊ शकतो असंही ते म्हणाले आहेत.

मी कालही शरद पवारांना दैवत मानत होतो, आजही मानतो पण.., अजितदादांच्या मनात काय?

बारामती लोकसभा मतदारसंघात जोपर्यंत शरद पवार खासदार होते तोपर्यंत सुप्रिया सुळे यांना संधी मिळाली नाही. मात्र, ज्यावेळी शरद पवार राज्यसभेवर निवडणून गेले त्यानंतर सुप्रिया सुळे यांच्यासाठी बारामतील लोकसभा मतदारसंघ खुला झाला असं युगेंद्र पवार म्हणाले. त्याचबरोबर जस शरद पवार साहेबांनी राज्यसभेवर जाण्याचा निर्णय घेतला तसा अजित पवारही पुढील काळात काही निर्णय घेतील असं म्हणत आता आपण अजित पवार बारामतीच्या राजकीय मैदानातून बाजूला होतील तेव्हाच निवडणूक लढवू असंच युगेंद्र पवार यांनी यावेळी सुचित केलं आहे.

यावेळी बोलताना युगेंद्र पवार यांनी पक्षात जी फूट पडली त्यावरही थेट भाष्य केलं आहे. ते म्हणाले जे आमच्या पक्षात घडलय. त्याचबरोबर पुढे जे लोकसभेला आणि विधानसभेला घडलं ते मला वयक्तिक काही पटलेलं नव्हत आणि ते आजही पटलेलं नाही. एक कुटूंब आहे. त्यामध्ये अशा गोष्टी घडू नयेत असं मला वाटत. मात्र, त्यांनी पक्ष एकत्र येण्यावर थेट बोलण टाळलं आहे. त्यावर बोलताना ते म्हणाले, मी पक्षात काम करणारा एक छोटा कार्यकर्ता आहे. पक्ष एकत्र यावा की नाही हा निर्णय अजित पवार आणि शरद पवार हेच घेऊ शकतात. बाकी, मला शरद पवार यांच्याप्रमाणे संघाची विचारसरणी आवडत नाही. मी काँग्रेसच्या विचारांचा आहे. त्यामुळे काम करत राहील. बारमतीकरांना जेव्हा वाटेल तेव्हा ते नक्की मला साथ देतील असा विश्वासही त्यांनी यावेळी बोलून दाखवला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube