दादा आणि पवार साहेब ठरवतील ते मान्य, वाढदिवशी युगेंद्र पवारांचा पवित्रा; ठाकरेंनंतर पवारही एकत्र येणार?

दादा आणि पवार साहेब ठरवतील ते मान्य, वाढदिवशी युगेंद्र पवारांचा पवित्रा; ठाकरेंनंतर पवारही एकत्र येणार?

Yugendra Pawar on Sharad Pawar and Ajit Pawar will toghter : एकीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकमेकांना टाळी देण्याची चर्चा करत आहेत. तर दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे देखील विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र येताना पाहायला मिळत आहे. कारण अजित दादा आणि शरद पवार एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळं पवार काका-पुतणेही एकत्र येणार असल्याची चर्चा जोर धरू लागलीये. यावर आता अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार यांनी देखील सूचक वक्तव्य केलं आहे.

काय म्हणाले युगेंद्र पवार?

बारामतीमधील विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संस्थेची बैठकीच्या निमित्ताने पवार कुटुंब एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. यावेळी शरद पवार, सुनेत्रा पवार, युगेंद्र पवार तसेच विश्वस्त एकत्र आले होते. त्यावेळी सुनेत्रा पवार सभास्थळी येताच युगेंद्र पवारांनी पाया पडून आशीर्वाद घेतला. त्यात नेमका युगेंद्र पवारांचा वाढदिवस देखील होते. तर सुनेत्रा पवार म्हणजे त्यांच्या काकींनी शुभाशीर्वाद घेतल्याचे दृश्य व्हायरल झाले आहे. त्यानंतर पवार कुटुंबीय एकत्र येण्याचे संकेत मानले जात आहे.

मुंबई शहरातील जमिनींवर होणाऱ्या लँड स्कॅमचा बादशाह.. आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंवर थेट वार

यावर बोलताना युगेंद्र पवार म्हणाले की, एकत्र येण्यावर काल दादांनी प्रेस घेत त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. विद्या प्रतिष्ठाण येथे अनेक वर्षापासून पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली पवार कुटुंबीय काम करत आहे. संस्था चांगली चालली पाहिजे, यावर आम्ही सातत्याने भूमिका घेत असतो.तसेच मी लहान असल्यापासून आम्ही एकत्र आहोत. एखाद वर्षे आमचं वेगळं गेल, तर सगळंच संपेल या विचाराचा मी नाही.काही झालं असेल तरी, दादा आणि काकीबद्दल माझ्या मनात प्रेम आणि आदर कायम आहे.

UPSC Result 2025 : पुण्याचा अर्चित डोंगरे देशात तिसरा, पहिल्या अन् दुसऱ्या क्रमांकावर कोण?

तसेच एकत्र येण्याबाबतच्या सुप्रिया सुळेंच्या भूमिकेवर ते म्हणाले की, ताई जर अस बोलत असतील तर आम्ही त्यांना पूर्णपणे सहमत आहोत. राजकारणात दादांनी वेगळा निर्णय घेतला असेल. तरी या अगोदर ते माझे काका आहेत. सकाळी काटेवाडीत जाऊन. मी आजीचा आशीर्वाद घेतला आहे.कोणतेही राजकीय कुटुंब घरातील कार्यक्रम असल्यावर एकत्र येत असतात. ही राज्याची परंपरा आहे.

मराठवाड्यात शेतकरी आत्महत्येचं विदारक वास्तव; वाचा, १ जानेवारी ते ३१ मार्चचे धक्कादायक आकडे

त्यामुळे आमचं कुटुंब म्हणून आम्ही एकत्रितच आहोत. आम्ही वेगळं झालो आहे असं मला वाटतं नाही.शेवटी आमचं रक्ताचं नात आहे. आता फक्त चर्चा आहे. मग जर पवार कुटूंब एकत्र आले तर पुढे पहायला मला आवडेल.पवार कुटुंब एकत्रच आहे. आम्ही सगळे लहान आहोत. त्यामुळे आमची भूमिका नेहमी सकारात्मक राहील.दादा आणि पवार साहेब ठरवतील ते आम्हाला मान्य असेल.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube