मुंबई शहरातील जमिनींवर होणाऱ्या लँड स्कॅमचा बादशाह.. आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंवर थेट वार

मुंबई शहरातील जमिनींवर होणाऱ्या लँड स्कॅमचा बादशाह.. आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंवर थेट वार

Ashish Shelar on Uddhav Thackeray : उद्ध ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार अशी चर्चा सुरू झाली तेव्हापासून राजकारण चांगलच तापलं आहे. भाजप नेते तर रोज टीका करत आहेत. दरम्यान, मुंबई शहरातील सर्व जमिनींवर होणाऱ्या लँड स्कॅमचा बादशाह हे उद्धव ठाकरे आहेत. (Thackeray ) त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या डोक्यात सतत लँड आणि लँड स्कॅम असे विचार सुरु असतात असा थेट घणाघात भाजप मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांनी केला आहे. ते मुंबईतील गरवारे क्लबमध्ये पार पडलेल्या भाजपच्या कार्यशाळेत बोलत होते.

उद्धव ठाकरे यांनी काही नवीन बोलणे सोडून दिले आहे. ते सतत ही जमीन अदानीला दिली, ती जमीन अंबानीला दिली, असंच बोलत असतात, अशी टीका भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांनी केले. काही दिवसांपूर्वीच आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांच्याशी असलेले वैयक्तिक मैत्रीचे संबंध पक्षीय राजकारणाच्या आड येत असतील तर ‘वैयक्तिक मित्र वैगेरे विषय संपला’, असंही म्हटलं होतं. त्यानंतर आता आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांनाही अंगावर घेतलं आहे.

उद्धव ठाकरे अन् राज ठाकरेंच्या एकीकरणाला कुणाचा विरोध; पक्षाच्या दुसऱ्या फळीच्या प्रतिक्रिया काय?

मुंबई महानगरपालिका 25 वर्षे उद्धव ठाकरे यांच्याकडे होती. आजघडीला मुंबईतील एक चौरस फूट क्षेत्रफळाची जागा लाखोंच्या घरात आहे. पण उद्धव ठाकरे यांनी पालिकेत त्यांची सत्ता असताना बिल्डरांना 1 कोटी चौरस फूट क्षेत्र फुकटात देण्याचे काम केले. ते आम्हाला काय जाब विचारतील, असे आशिष शेलार यांनी म्हटले. यावेळी आशिष शेलार यांनी वक्फ कायद्यासंदर्भातही भाष्य केले. उद्धव ठाकरे यांच्याकडून खोटी माहिती पसरवली जात आहे असंही ते म्हणाले आहेत.

तुमची संपत्ती घेणार, मशीद घेणार, स्मशानभूमी घेणार, असे खोटे पसरवले जात आहे. या देशात कायदा आहे. तसे काहीही करता येणार नाही. वक्फ विधेयक हे गरीब मुस्लिमांच्या फायद्यासाठी आहे. नरेंद्र मोदी सरकार वक्फ बोर्डाने घेतलेल्या जमिनी पुन्हा देण्यासाठी काम करत आहे. आम्ही आयुष्यभर विरोधी पक्षात होतो, कधीच आम्ही म्हटलं नाही की, संसदेचे कायदे आम्ही मानणार नाही. मुस्लिम देखील पुढे येऊन मोदींचे अभिनंदन करत आहेत. जे मुस्लिम समाजाला व्होट बँक समजतात तेच लोक याला विरोध करत आहेत असा टोलाही त्यांनी लगावला आहे

follow us
  • fb
  • instagram
  • youtube