लगीनघाई! युगेंद्र पवारांचा साखरपुडा, पवार कुटुंबाची नवी सून आहे तरी कोण?

Who Is Yugendra Pawar Wife Tanishka : युगेंद्र पवारांच्या (Yugendra Pawar) साखरपुड्यावरील सस्पेन्स अखेर संपला आहे. आत्या सुप्रिया सुळे यांनी (Supriya Sule) सोशल मिडिया पोस्ट करत यावरील पडदा उघडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांचे नातू आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यांच्या साखरपुड्याची चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच अत्यंत खासगी वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्याबद्दल अनेकांना उत्सुकता होती. विशेषतः, युगेंद्र पवार यांची होणारी पत्नी कोण आहे, याचा उलगडा होत नव्हता.
काँग्रेसची 75 वर्षांची साथ सोडत, कुणाल पाटील भाजपच्या वाटेवर; धुळ्याच्या राजकारणात काय घडतंय?
युगेंद्र पवार आणि तनिष्का प्रभू यांचा साखरपुडा
खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या व्हॉट्सअॅप स्टेटसद्वारे ही माहिती अधिकृतरित्या शेअर केली आहे. त्यांनी युगेंद्र पवार आणि त्यांच्या होणाऱ्या पत्नीचा एक सुंदर फोटो स्टेटसवर शेअर करत दोघांना शुभेच्छा दिल्या. या स्टेटसमध्ये त्यांनी लिहिलं, युगेंद्रचा तनिष्कासोबत साखरपुडा पार पडला. आम्ही सगळे खूप आनंदी आहोत. सुप्रिया सुळे यांचे हे स्टेटस सोशल मीडियावर काही तासांतच प्रचंड व्हायरल झालं आहे.
युगेंद्र पवार आणि तनिष्का प्रभू यांचा साखरपुडा अत्यंत मोजक्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत पार पडला होता. त्यामुळे त्यासंबंधीची कोणतीही माहिती सुरुवातीला उघड झाली नव्हती.
View this post on Instagram
पवारांची नवी सुनबाई आहे तरी कोण?
युगेंद्र पवार यांची होणारी पत्नी तनिष्का प्रभू ह्या मूळच्या मुंबईतील आहेत. त्यांचे शिक्षण परदेशात झाले असून त्यांनी फायनान्समध्ये विशेष अभ्यास केला आहे. पवार घराण्यातून येणाऱ्या या नव्या पिढीतील जोडप्याच्या नात्यात आधुनिक शिक्षण आणि पारंपरिक राजकीय वारसा यांचा सुंदर मिलाफ पाहायला मिळणार आहे.
राजकारणात पावलं रोवणारा युगेंद्र
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर युगेंद्र पवार यांनी राकांपा (शरद पवार गट) पक्षात सक्रीय सहभाग घेतला. लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांचा प्रचार करताना त्यांनी गावोगावी दौरे केले, तरुण कार्यकर्त्यांची टीम तयार केली, आणि बारामती मतदारसंघात स्वतःचं नेतृत्व उभं केलं. याच जोरावर त्यांना शरद पवारांनी याच जोरावर त्यांना शरद पवारांनी विधानसभा तिकीट दिलं आणि त्यांनी थेट आपले काका – अजित पवार यांच्याविरुद्ध निवडणूक लढवली.
काँग्रेसची 75 वर्षांची साथ सोडत, कुणाल पाटील भाजपच्या वाटेवर; धुळ्याच्या राजकारणात काय घडतंय?
अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांचा साखरपुडा दोन महिन्यांपूर्वीच झाला होता. त्यानंतर आता युगेंद्र पवार सुद्धा विवाहबंधनात अडकणार आहेत. एप्रिल महिन्यात झालेल्या वाढदिवसावेळी शरद पवारांनी ‘अक्षता टाकायची संधी कधी देणार?’ असा गंमतीशीर सवाल विचारला होता. आता त्या प्रश्नाचं उत्तर साखरपुड्याच्या रूपात मिळालं आहे.