काँग्रेसची 75 वर्षांची साथ सोडत, कुणाल पाटील भाजपच्या वाटेवर; धुळ्याच्या राजकारणात काय घडतंय?

काँग्रेसची 75 वर्षांची साथ सोडत, कुणाल पाटील भाजपच्या वाटेवर; धुळ्याच्या राजकारणात काय घडतंय?

Congress Leader Kunal Patil Will Join Bjp Dhule : धुळे जिल्ह्यातील काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार कुणाल पाटील (Kunal Patil) यांनी अलीकडेच भाजपचे प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली. त्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. या बैठकीनंतर त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना जोर चढला. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर कुणाल पाटील राजकारणात (Dhule Politics)काहीसे बाजूला पडले होते. आता त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याची माहिती पुढे आली आहे. सध्या फक्त त्यांच्या पक्षप्रवेशाची (BJP) अधिकृत घोषणा उरली असून, ती लवकरच होण्याची शक्यता आहे.

शनिवारी पाटील यांनी आपल्या समर्थकांचा मेळावा घेऊन त्यांच्या मनाचा अंदाज घेतला. या बैठकीत उपस्थित असलेल्या बहुसंख्य कार्यकर्त्यांनी ‘पाटील साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल’ असा कौल दिला, ज्यामुळे त्यांच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा झाल्याचं स्पष्ट झालं.’

उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर! आभाळ फाटलं, 9 जण बेपत्ता; चारधाम यात्रा थांबवली

काँग्रेसला मोठा धक्का

एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या धुळे जिल्ह्यात आज भाजपचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. अशा वेळी काँग्रेसच्या एकमेव प्रभावी चेहऱ्यापैकी एक असलेले कुणाल पाटील भाजपमध्ये प्रवेश करत असल्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसणार आहे. त्यांच्या घराण्याचं काँग्रेससोबतचं नातं तब्बल 75 वर्षांचं आहे. मंत्रीपद, आमदारकी आणि खासदारकीच्या माध्यमातून त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी काँग्रेसमध्ये मोठं योगदान दिलं आहे. त्यांच्या जवाहर शिक्षण संस्थेचाही काँग्रेसच्या सत्ताकाळात मोठा विस्तार झाला होता.

अमरावतीच्या एपीआयची हत्या; फोर व्हिलरने उडवलं नंतर धारदार शस्त्राने सपासप वार, तीन आरोपींना अटक

परंतु मागील काही निवडणुकांमध्ये पाटील यांना अपयशाला सामोरं जावं लागलं. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांचा पराभव झाला, त्यांच्या स्वतःच्या गावातही त्यांना अपेक्षित मतं मिळाली नव्हती. गेल्या लोकसभा निवडणुकीसाठी त्यांनी उमेदवारी नाकारली होती, त्याच वेळी त्यांच्या राजकीय भूमिकेतील बदलाबद्दल चर्चेला सुरुवात झाली होती.

कुणाल पाटील यांचा भाजप प्रवेश?

आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पाटील भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचं स्पष्ट होत आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री जयकुमार रावल, माजी खासदार डॉ. सुभाष भामरे, राम भदाण, सुभाष देवरे, बापू खलाणे आणि धरती देवरे यांच्यासह भाजपच्या प्रमुख नेत्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत पाटील यांच्या पक्षप्रवेशावर चर्चा झाली.

गेल्या काही आठवड्यांपासून पाटील सतत भाजप नेत्यांच्या संपर्कात होते. पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या कार्यालयातही त्यांनी भेट देऊन महत्त्वपूर्ण चर्चा केली होती. त्यामुळे येत्या काही दिवसांत कुणाल पाटील यांचा भाजप प्रवेश निश्चित असून, काँग्रेसला धुळे जिल्ह्यात त्याचा मोठा राजकीय फटका बसणार आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube