Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर ( Prakash Ambedkar ) यांना जागावाट आणि अजेंड्याबद्दल एक सल्ला दिला आहे. राऊत म्हणाले की, आघाड्यांमध्ये सगळ्यांच्याच मनाप्रमाणे होत नाही. ती टिकवण्यासाठी हट्ट सोडला पाहिजे. राऊत पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. त्यावेळी त्यांनी आंबेडकरांना उद्देशूने प्रतिक्रिया दिली.
काय म्हणाले संजय राऊत?
यावेळी बोलताना राऊत म्हणाले की, आघाड्यांमध्ये सगळ्यांच्याच मनाप्रमाणे होत नाही. आम्ही युतीत होतो. त्यावेळी देखील आमच्या मनासारखं झालं नाही. आता आम्ही महाविकास आघाडीत आहोत. आघाडी धर्म टिकविण्यासाठी आपल्याच मनाप्रमाणे होईल हा हट्ट सोडला पाहिजे. शिवसेनेने अनेक महत्त्वाच्या जागा आघाडीमध्ये सोडलेल्या आहेत.
Laapataa Ladies Special Offer: किरण रावने चाहत्यांना दिले मोठे सरप्राईज गिफ्ट…
प्रकाश आंबेडकरांबरोबर आमची चर्चा उत्तम झाली. काही जागांच्या संदर्भात पुढे चर्चा होईल. काहीच घडलं नाही हे सांगणं त्यामुळे बरोबर नाही. वंचितच्या बाबतीमध्ये चर्चा फार पुढे गेली आहे. प्रकाश आंबेडकर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष भाजपाला मदत होईल असं काही करणार नाही. ज्याप्रमाणे मायावती करत आहेत. त्यांना संविधानाचे रक्षण करायचं आहे आणि आम्हाला सुद्धा तेच करायचं आहे म्हणून आम्ही एकत्र आहोत.
आघाडी माझ्यासोबत नाही; असं का म्हणाले आंबेडकर?
आंबेडकर यांच्या अजेंड्यांपैकी एक महत्त्वाचा अजेंडा होता की, 48 पैकी आपण 15 उमेदवार ओबीसीची द्यायला हवेत. तसेच तीन उमेदवार हे अल्पसंख्यांक मुस्लिम असावेत. त्यावर देखील कोणतीही चर्चा झाली नाही. तसेच आपण सर्व भाजपच्या विरोधात लढण्यासाठी एकत्र येत आहोत. त्यामुळे निवडणुकांपूर्वी महाविकास आघाडीतील कोणताही पक्ष भाजप सोबत युती किंवा आघाडी करणार नाही. असे सर्वांनी लेखी दिले पाहिजे. हा ही प्रस्ताव मी मांडला होता. मात्र त्यावर देखील चर्चा झाली नाही.
मी आघाडी सोबत पण आघाडी माझ्यासोबत नाहीच; मविआच्या बैठकीत असं का म्हणाले आंबेडकर?
त्या बैठकीमध्ये प्रकाश आंबेडकरांचा एक वाक्य होतं. ते म्हणजे मी आघाडी सोबत आहे. पण मला असं वाटतं की, आघाडी माझ्यासोबत नाही. तसेच ते म्हणाले की, भाजपला हरवण्यासाठी मी माझी अकोल्याची जागा देखील देण्यासाठी तयार आहे. पण सर्वांनी बोललं पाहिजे. तसेच आघाडीतील कोणत्याही पक्षाने वंचितला किती जागा देणार? हे देखील स्पष्ट केलेलं नाही. त्यामुळे राहिलेले अजेंडा आणि जागावाटपाच्याबाबत चर्चा करण्यासाठी थोडा वेळ मागून घेण्यात आला असून पुढच्या आठवड्यात पुन्हा एकदा ही बैठक होणार आहे.