मी आघाडी सोबत पण आघाडी माझ्यासोबत नाहीच; मविआच्या बैठकीत असं का म्हणाले आंबेडकर?

मी आघाडी सोबत पण आघाडी माझ्यासोबत नाहीच; मविआच्या बैठकीत असं का म्हणाले आंबेडकर?

Prakash Ambedkar : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर ( Prakash Ambedkar ) हे काल ( 6 मार्च ) ला झालेल्या महाविकास आघाडीच्या आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या बैठकीला हजर होते. त्यावेळी आंबेडकर यांनी म्हटलं की, मी आघाडी सोबत आहे पण मला असं वाटतं की आघाडी माझ्यासोबत नाही. याबद्दल वंचितचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी माहिती दिली.

दोन आमदारांचा नकार, गडकरींविरोधात काँग्रेसला उमेदवारच नाही; नागपुरातील ‘गणित’ अवघड

सिद्धार्थ मोकळे म्हणाले की, लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि मी उपस्थित होतो. यामध्ये आम्ही काही अचर्चित राहिलेले मुद्दे पुढे आणण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावर कोणतीही चर्चा झाली नाही. जरांगेंच्या आंदोलनावर महाविकास आघाडीची काय भूमिका असणार आहे. यावर चर्चा झाले नाही.

Pushpa 2: अल्लू अर्जुनच्या चित्रपटात संजय दत्तची एन्ट्री? ‘पुष्पा 2’ मध्ये साकारणार ही व्यक्तिरेखा

गेल्या वेळी आम्ही दिलेल्या अजेंड्यांपैकी एक महत्त्वाचा अजेंडा होता की, 48 पैकी आपण 15 उमेदवार ओबीसीची द्यायला हवेत. तसेच तीन उमेदवार हे अल्पसंख्यांक मुस्लिम असावेत असा प्रस्ताव आम्ही मांडला होता. मात्र त्यावर देखील कोणतीही चर्चा झाली नाही. तसेच आपण सर्व भाजपच्या विरोधात लढण्यासाठी एकत्र येत आहोत. त्यामुळे निवडणुकांपूर्वी महाविकास आघाडीतील कोणताही पक्ष भाजप सोबत युती किंवा आघाडी करणार नाही. असे सर्वांनी लेखी दिले पाहिजे हा ही प्रस्ताव मी मांडला होता मात्र त्यावर देखील चर्चा झाली नाही.

त्या बैठकीमध्ये प्रकाश आंबेडकरांचा एक वाक्य होतं. ते माझ्या मनाला लागलं. ते म्हणजे मी आघाडी सोबत आहे. पण मला असं वाटतं की आघाडी माझ्यासोबत नाही. तसेच ते म्हणाले की, भाजपला हरवण्यासाठी मी माझी अकोल्याची जागा देखील देण्यासाठी तयार आहे. पण सर्वांनी बोललं पाहिजे. तसेच आघाडीतील कोणत्याही पक्षाने वंचितला किती जागा देणार? हे देखील स्पष्ट केलेलं नाही. त्यामुळे राहिलेले अजेंडा आणि जागावाटपाच्याबाबत चर्चा करण्यासाठी थोडा वेळ मागून घेण्यात आला असून पुढच्या आठवड्यात पुन्हा एकदा ही बैठक होणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube