Download App

सिंचन घोटाळ्यातील नेता योग्य जागी; राऊतांकडून अमित शाह टार्गेट

Sanjay Raut On Amit Shah : अजितदादा आज तुम्ही योग्य ठिकाणी बसलेला आहात, हीच तुमची योग्य जागा, याठिकाणी बसण्यासाठी तुम्ही थोडा उशीरच केला असल्याचं विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पुण्यातील जाहीर कार्यक्रमात केलं होतं. त्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अमित शाह यांना टोला लागावला आहे. (Sanjay Raut Criticize Amit Shah for Appreciation of Ajit Pawar )

आता बिनधास्त वापरा ‘X’; अडचणीत सापडलेल्या युजर्सना मस्क देणार कायदेशीर बळ

काय म्हणाले संजय राऊत?
संजय राऊत म्हणाले की, अमित शाह यांनी जे अजित पवारांचे जे कौतुक केलं ते कौतुक त्यांनी 2024 नंतर देखील करावं. अजितदादा योग्य जागी आहेत. त्यांची हीच भूमिका त्यांनी 2024 नंतरही कायम ठेवावी. तसेच सध्या देशाचे राजकारण ज्या पद्धतीने सुरू आहे. त्यावरून योग्य अयोग्यतेच्या व्याख्या कोणीही ठरवू नये अशी टीका राऊत यांनी केली.

राष्ट्रवादीत दोन गट असल्याचा पुरावा नाही, निवडणूक आयोगात शरद पवार गटाचे उत्तर

पुढे राऊत म्हणाले की, पंतप्रधान मोदी याच राष्ट्रवादी कॉंग्रेसला करप्ट पार्टी आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भ्रष्टाचारी म्हणत होते. या पक्षांच्या नेत्यांनी 70 हजार कोटींचा सिंचन घोटाळा केला. असा आरोप मोदी करत होते. त्याच नेत्याला आज अमित शाह योग्य जागी आहे.असं म्हणत आहेत. अस टोला संजय राऊतांनी लगावला आहे.

काय म्हणाले अमित शाह?

पुण्यात केंद्रीय सहकार संस्था निबंधक कार्यालयाच्या डिजिटल पोर्टलचं उद्घाटन करण्यात आलं. पोर्टलचं उद्घाटन मंत्री अमित शाह यांच्या करण्यात आलं. या कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित होते. त्यावेळी अजितदादा आज तुम्ही योग्य ठिकाणी बसलेला आहात, हीच तुमची योग्य जागा, याठिकाणी बसण्यासाठी तुम्ही थोडा उशीरच केला असल्याचं विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अजितदादांसमोरच केलं होतं.

Tags

follow us