मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मनसेला (Mumbai) महाविकास आघाडीत घ्यायचं की नाही यावरुन काँग्रेसमध्ये मतमतांतरे आहेत. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी मनसेसोबत जाण्यास नकार दिल्याचं समजतय. तर, विजय वडेट्टीवार यांचा मात्र मनसेला सोबत घेण्याकडं कल आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादीचे शरद पवारही मनसेला सोबत घेण्याविषयी सकारात्मक दिसतात. अशातच आता संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे.
शिवसेना आणि मनसे हे आधीपासूनच एकत्र आले आहेत, ही लोकांची इच्छा असल्याचं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं. दिल्लीतून आदेश आल्याशिवाय मनसेला सोबत घेणार नाही हा काँग्रेसचा निर्णय वैयक्तिक असू शकतो असंही ते म्हणाले आहेत. शिवसेना आणि मनसे एकत्रच असून त्यासाठी आम्हाला कुणाचा आदेश किंवा कुणाच्या परवानगीची गरज नसल्याचं थेट मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं. शरद पवार आणि डावे पक्षसोबत मुंबई वाचवण्यासाठी आमच्यासोबत आहेत असंही संजय राऊत म्हणाले आहेत.
राज ठाकरेंसोबत आघाडीला नकार ; मनसे सोबत न जाण्यावर काँग्रेस ठाम?
हा काँग्रेसचा व्यक्तिगत निर्णय असू शकतो. शिवसेना आणि मनसे आधीच एकत्र आले आहेत, ही लोकेच्छा आहे. त्यासाठी कुणाच्या आदेश किंवा परवानगीची गरज नाही. शरद पवार आणि डावे पक्ष सुद्धा एकत्र आहेत, मुंबई वाचवा असं संजय राऊत आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत. काँग्रेसचा निर्णय काहीही असो, मुंबई महापालिका निवडणूक दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येऊन लढवणार असल्याचं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. त्यासाठी इतर लहान पक्षांचाही पाठिंबा असल्याचं ते म्हणाले. दुसरीकडे, मनसेला महाविकास आघाडीमध्ये घेण्यासाठी आपण सकारात्मक असल्याचं शरद पवारांनीही स्पष्ट केलं आहे.
काय म्हणाले राऊत ?
दिल्लीतून आदेश आल्याशिवाय
म न से ला आघाडीत घेणार नाही: मुंबई कांग्रेस
हा कांग्रेस चा व्यक्तिगत निर्णय असू शकतो
शिवसेना आणि म न से आधीच एकत्र आले आहेत,ही लोकेच्छा आहे
त्यासाठी कुणाच्या आदेश किंवा परवानगीची गरज नाही
श्री शरद पवार आणि डावे पक्ष सुद्धा एकत्र आहेत
मुंबई वाचवा!
