Sanjay Raut On Maharashtra Government: महानंद डेअरी (Mahananda Dairy) गुजरातच्या शिरपेचात आणखी एक महत्त्वाचा उद्योग गुजरातला देण्याचा डाव आज उघड झाला आहे. महाराष्ट्रात (Maharashtra) अनेक दुधाचे ब्रँड आहेत. ग्रामीण भागामध्ये दूध उत्पादन, दूध डेअरी याचा फार मोठा जाळ आहे. त्यासाठी राज्यामध्ये अमूलचं पाहिजे असं नाही. कर्नाटक मध्ये अशाचं प्रकारचा एक ब्रँड केंद्र सरकारने मारण्याचा प्रयत्न केला आणि त्या एका नंदिनी ब्रँड वर कर्नाटक सरकारची निवडणूक लढवली गेली. असे म्हणत ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
मला वाटतं महानंदा त्या संदर्भात जे वास्तव मी पाहतो आहे, गुजरातला नेण्याचा हा प्रकार सुरू आहे. महानंदा ही महाराष्ट्राची ओळख आहे. ती ओळख पुसून टाकली जात आहे. यामागे कोण आहे? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना हा भ्रष्टाचार घोटाळा दिसून येत नाही का? रोज एक एक व्यवसाय खेचून गुजरातमध्ये नेले जात आहे आणि हे तोंडाला कुलूप लावून बसले आहेत. हे कसले महाराष्ट्राचे राज्यकर्ते आहेत? दूध व्यवसायाची सहकारी चळवळ प्रत्येक गोष्ट तुम्ही घेऊन जात आहात. जर महानंदा नेण्याचा प्रकार झाला, तर शिवसेना गप्प बसणार नाही, असा इशारा राऊतांनी सरकारला यावेळी दिली आहे.
इंडिया आघाडीची अशा प्रकारची कुठलीही बैठक झाली नाही. काल उद्धव ठाकरे आणि नितीश कुमार यांची फोनवर चर्चा झाली. आगामी काळात उद्धव ठाकरे आणि इतर नेत्यांशी बोलत आहेत. काँग्रेसवर फार भार न टाकता इंडिया आघाडीचे संघटन बनवण्याची जबाबदारी सर्वांनी घेतली पाहिजे. ही आमची भूमिका आहे. त्यासाठीचं नितीश कुमार आणि उद्धव ठाकरे यांची चर्चा झाली, असे संजय राऊत यावेळी म्हणाले.
Ashok Chavan : ‘भाजपाच्या संपर्कात कोण, नावं द्या’; चव्हाणांचं थेट विखेंना आव्हान
संजय राऊत पुढे म्हणाले की, आज दुपारी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा प्रचंड मोर्चा आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून एक लाखांपेक्षा जास्त कर्मचारी शिक्षक हे आझाद मैदानावर येत आहेत. त्यांच्या मागण्या वर्षानुवर्षे आहेत, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यात लक्ष घालण्याचा प्रयत्न केला. पण कोविडमुळे त्यात फार काही करता आलं नाही. अंगणवाडी कर्मचारी संपावर आहेत. आज आझाद मैदानावर विराट मोर्चा आहे. आम्ही त्यांच्या मागण्यांना पाठिंबा दिला आहे. आज तीन वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आझाद मैदानावर जाऊन अंगणवाडी कर्मचाऱ्यांना संबोधित करणार असल्याची माहिती यावेळी राऊतांनी दिली आहे.
सरकार ज्या पद्धतीने कायदा बनवत आहे आणि जनतेची माफी मागत आहेत, त्याचा हा परिणाम आहे. हे सगळे विरोधी पक्ष संसदेत नसताना कायदे मान्य करून घेतले आहेत. चर्चा न घडवून घेता, जेव्हा असे कायदे मान्य करून घेतले जातात तेव्हा जनतेचा असा उठाव होतो. तसेच पुढे म्हणाले की, आदित्य ठाकरे यांनी जो स्पोर्ट केला आहे, तो अत्यंत धक्कादायक आहे. संपूर्ण महाराष्ट्र मुंबई लुटण्याचा आणि तो बिल्डर यांचा देशात घालण्याचा तो प्रयत्न आहे. तो आम्ही होऊ देणार नाही.