Ashok Chavan : ‘भाजपाच्या संपर्कात कोण, नावं द्या’; चव्हाणांचं थेट विखेंना आव्हान

Ashok Chavan : ‘भाजपाच्या संपर्कात कोण, नावं द्या’; चव्हाणांचं थेट विखेंना आव्हान

Ashok Chavan replies Radhakrishna Vikhe : लोकसभा निवडणुका जवळ येत चालल्या आहेत तसे दबावाच्या (Lok Sabha Election 2024) राजकारणाने वेग घेतला आहे. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe) यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेसमधील अनेक जण भाजपात येण्यास इच्छुक असल्याचे वक्तव्य करत खळबळ उडवून दिली होती. त्यांच्या या वक्तव्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सडकून टीका केली होती. राज्यात भाजपाची सत्ता नसेल तेव्हा तुम्ही कुठे राहाल याचा विचार करा, असे राऊत म्हणाले होते. त्यानंतर आता काँग्रेस नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनीही विखे पाटलांना थेट आव्हानच दिले आहे. काँग्रेसमधील अनेक जण भाजपात येण्यासाठी इच्छुक असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी म्हटलं होतं. तेव्हा भाजपाच्या संपर्कात कोण आहेत त्यांची नावं जाहीर करा, असं गुपित ठेऊ नये, असे चव्हाण म्हणाले.

Ashok Chavan : ‘तारीख पे तारीख मिलती है लेकिन’.. सरकारच्या कारभारावर चव्हाणांचा फिल्मी डायलॉग

महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा मुद्दा चर्चेत आहे. घटक पक्षांकडून मतदारसंघांवर दावा केला जात आहे. यावरही चव्हाण यांनी भाष्य केलं. चव्हाण म्हणाले, जागावाटपाबाबत केंद्रीय समितीची बैठक झाली आहे. समितीने आमची मतं जाणून घेतली. केंद्रीय समिती सूचना देईल त्यानुसार महाविकास आघाडीतील घटक पक्षांबरोबर चर्चा करू.  मित्र पक्षांना महाविकास आघाडीत घेण्याबाबत कोणतेही मतभेद नाहीत, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले.

काय म्हणाले होते विखे पाटील?

राज्यातील अनेक काँग्रेस नेते भाजपाच्या संपर्कात असून ते लवकरच भाजपात प्रवेश करतील असा दावा मंत्री विखे पाटील यांनी केला होता. त्यांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. सध्या फक्त काँग्रेसच अशा पक्ष आहे जो अजूनपर्यंत फुटलेला नाही. त्यामुळे काँग्रेसच्या फोडाफोडीवर सत्ताधाऱ्यांची नजर आहेच. आता विखेंच्या वक्तव्याने त्याला आणखी बळ मिळालं आहे. काँग्रेसमधील कोणता नेता भाजपात जाण्यास इच्छुक आहे याचीही चर्चा आता सुरू झाली आहे. त्यामुळे अशोक चव्हाण यांनी थेट विखेंनाच नावं जाहीर करण्याचं आव्हान दिलं आहे. या आव्हानाला मंत्री विखे पाटील आता काय उत्तर देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

विखेंच्या बालेकिल्ल्यात शरद पवार; लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकणार?

follow us
  • fb
  • instagram
  • youtube