विखेंच्या बालेकिल्ल्यात शरद पवार; लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकणार?

विखेंच्या बालेकिल्ल्यात शरद पवार; लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकणार?


Ahmednagar News :
राज्यात येत्या काळात लोकसभा-विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यानुषंगाने आता राजकीय नेतेमंडळींच्या भेटीगाठी तसेच चर्चांना वेग प्राप्त झाला आहे. यातच राष्ट्रवादीचा (NCP) बालेकिल्ला असलेल्या नगर जिल्ह्यात स्वतः राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) हे लक्ष ठेवून आहेत. शिबिरानिमित्त ते शिर्डीमध्ये 3 व 4 जानेवारी रोजी असणार आहे. मंत्री राधाकृष्ण विखेंचा (Radhakrushna Vikhe) बालेकिल्ला समजला जाणारा व राजकीय वर्दळ असलेल्या शिर्डीमध्ये शरद पवार येऊन लोकसभेचे रणशिंग फुंकणार अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. मंत्री विखेंचे चिरंजीव सुजय विखे यांच्या विरोधात लोकसभेसाठी प्रबळ उमेदवाराची चाचपणी या शिबिराच्या माध्यमातून होणार असल्याने या शिबिराला राजकीय महत्व प्राप्त झाले आहे.

मनमाडच्या संपावर मोठा निर्णय! राज्यात पेट्रोल-डिझेल पुरवठा सुरु, 24 तासात पुरवठा…

40 वर्षानंतर शरद पवार नगर जिल्ह्यातील ‘या’ गावी
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे मंगळवारी 2 जानेवारी रोजी संगमनेर तालुक्यातील आश्वी येथे रिपाईचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब गायकवाड यांच्या गौरव सोहळ्यासाठी येणार आहेत. विशेष म्हणजे तब्बल चाळीस वर्षांनंतर पवार हे आश्वीला येणार आहेत. पवार यांचे बालपण हे शिक्षणानिमित्त लोणी परिसरात गेले आहे. त्यामुळे या परिसराची राजकीय, सामाजिक व आर्थिक बाबींची तंतोतंत माहिती पवारांना आहे. मुख्यमंत्री असताना शरद पवार यांनी चाळीस वर्षापूर्वी आश्वी गावाला भेट दिली होती.

शिर्डीतून निवडणुकीचे रणशिंग फुंकणार :
शिर्डीत राष्ट्रवादीचे शिबीर पार पडणार आहे. येत्या 3 आणि 4 जानेवारीला राष्ट्रवादीचं शिबीर पार पडणार आहे. शिर्डीमधून अनेक राजकीय पक्षांनी, नेत्यांनी निवडणुकीचे रंणशिंग फुंकल्याचे आजवर दिसून आले आहे. किंबहुना पवारांनी देखील याच गोष्टी लक्षात घेत राष्ट्रवादीचे शिर्डीमध्ये शिबिर आयोजित केले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. दरम्यान, राष्ट्रवादीमधील फुटीपूर्वी नगर जिल्ह्यात राष्ट्रवादीचे सर्वाधिक सहा आमदार होते. त्यामुळे नगर जिल्ह्याला राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जात असतं.

Hit and Run : नव्या कायद्यात नेमकं काय? कठोर तरतुदींचा उल्लेख करत असीम सरोदेंनी केंद्राला सुनावलं

मात्र, राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडल्यानंतर अजित पवार गट व शरद पवार गट निर्माण झाला. त्यानंतर आमदार देखील विभागले गेले आहेत. अजितदादा गटाकडे 4 तर शरद पवार गटाकडे 2 आमदार राहिले आहेत. जिल्हा पुन्हा शरद पवार यांच्या प्राबल्याखाली आणण्यासाठी या शिबिराचा उपयोग केला जाणार असल्याचे दिसते आहे. तसेच याच शिबिरामध्ये आगामी लोकसभेसाठी उमेदवाराची चाचपणी केली जाणार आहे.

शरद पवार कोणती गुगली टाकणार?
आगामी लोकसभा विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवत निवडणुकीची चाचपणी करत शरद पवार हे रणशिंग फुकण्याची शक्यता असल्याने कार्यकर्ते उत्साहात आहे. तसेच राजकारणात गुगली टाकण्यात शरद पवार माहिर असल्याने या दोन दिवसीय शिबिरातून ते कोणती राजकीय गुगली टाकतील याचा नेम नाही. विशेष म्हणजे काँग्रेसचे प्रदेश शिबीरही शिर्डीमध्ये झाले त्याचबरोबर आठवले गटाचे शिबिरही शिर्डीमध्ये झाले होते. या दोन्ही शिबीरातून लोकसभेच्या संभाव्य उमेदवारांची चर्चा झाली. आता राष्ट्रवादीच्या शिबिरातून कोणाची चर्चा होणार? व शरद पवार कोणाला, कधी, कशी संधी देतील? हे सांगता येत नाही.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज