Radhakrishna Vikhe : सत्तेसाठी एकत्र आलेले लोक म्हणजे ‘इंडिया’ आघाडी; विखे पाटलांनी व्याख्याच सांगितली

Radhakrishna Vikhe : सत्तेसाठी एकत्र आलेले लोक म्हणजे ‘इंडिया’ आघाडी; विखे पाटलांनी व्याख्याच सांगितली

Radhakrishna Vikhe : राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी (Radhakrishna Vikhe) विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीवर घणाघाती टीका केली. इंडिया आघाडी (INDIA Alliacne) म्हणजे सत्तेच्या लालसेने एकत्र आलेले लोक आहेत. हे कधीच समोर आले नाहीत, अशी टीका मंत्री विखे पाटील होते. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातर्फे आयोजित करण्यात आलेल्या कृषी प्रदर्शनाच्या निमित्तान मंत्री विखे पाटील अकोल्यात आले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

इंडिया आघाडी म्हणजे सत्तेच्या लालसेने एकत्र आलेले लोक आहेत. हे कधीच समोर आले नाहीत. यांच्याकडे कोणताही समान कार्यक्रम नाही. देशाच्या भवितव्याचा विचारही या लोकांकडे नाही. केवळ सत्तेसाठी हपापलेली ही आघाडी आहे, अशी टीका विखे पाटील यांनी केली. कृषी विद्यापीठांनी शेतकऱ्यांना फक्त मार्गदर्शन करू नये तर विद्यापीठानं जे संशोधन केलं आहे ते शेतकऱ्यांपर्यंत कसं पोहोचेल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. कृषी विद्यापीठ आणि राज्य सरकार दोघांनी मिळून शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी कशा करता येतील यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Radhakrishna Vikhe : उद्धवजी, आता खुलासा कराच! ‘सनातन’च्या वक्तव्यावर विखेंचं आव्हान

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज