Radhakrishna Vikhe : उद्धवजी, आता खुलासा कराच! ‘सनातन’च्या वक्तव्यावर विखेंचं आव्हान
Radhakrishna Vikhe : सनातन धर्माबद्दल उदयनिधी स्टॅलीन (Udhayanidhi Stalin) यांनी केलेले बेताल वक्तव्य म्हणजे त्यांना मेंदूज्वर झाल्याचे लक्षण असून जिहादी प्रवृत्तीच्या या वक्तव्याने हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. आता त्यांच्या वक्तव्यावर महाराष्ट्रातील इंडिया आघाडीच्या नेत्यांनी खुलासा करावा असे आव्हान राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) पाटील यांनी दिले आहे.
हिंदू धर्माबद्दल उदयनिधी स्टॅलीन यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करुन मंत्री विखे (Radhakrishna Vikhe) म्हणाले, हिंदू धर्माला हजारो वर्षांची परंपरा आहे. भगवद्गीतेपासून ते ज्ञानेश्वरीपर्यंतचा वैचारिक वारसा या भूमीत दृढ झाला आहे. त्याला नष्ट करण्याची किंवा इजा पोहोचविण्याची ताकद असल्या उपद्रवी मच्छरांमध्ये नाही.
Udhayanidhi Stalin : ‘सनातन’ वक्तव्यावर उदयनिधी स्टॅलिन ठाम; म्हणाले, ‘मी पुन्हा-पुन्हा..,’
आता या उदयनिधींचे वडील ज्या इंडिया आघाडीमध्ये (INDIA Alliance) सहभागी झाले आहेत. त्याच आघाडीचे नेतृत्व उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) करायला निघाले आहेत. आता स्टॅलीन यांचे वक्तव्य त्यांना मान्य आहे का? याचाही खुलासा करण्याची गरज आहे. कारण उद्धव ठाकरे यांचे हिंदुत्वाचे प्रेम सोयीनुसार उफाळून येत आहे. उठसूट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा सांगून तुमचे हिंदुत्व सिद्ध होणार नाही. त्यामुळे उद्धवजी आता सत्तेच्या हव्यासापोटी हिंदू धर्माबद्दल अशी विधानं करणाऱ्या मच्छरांना आपल्या भोवती गोळा करणार का? असा खोचक सवाल विखे यांनी विचारला.
काय म्हणाले उदयनिधी स्टॅलिन ?
‘सनातन हे संस्कृत नाव आहे. तर सनातन धर्म हा सामाजिक न्याय आणि समतेच्या विरोधात आहे. काही गोष्टींना विरोध करता येत नाही, त्या संपवल्याच पाहिजेत. आम्ही डेंग्यू, डास, मलेरिया किंवा कोरोनाला विरोध करू शकत नाही. ते नष्टच करुन टाकायचे असतात. तसेच सनातनलाही नष्ट करायचे आहे,’ असे वादग्रस्त वक्तव्य स्टॅलिन यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. या वक्तव्याच्या विरोधात लोकांनी संताप व्यक्त केला. तसेच स्टॅलिन यांच्याविरोधात अनेक ठिकाणी तक्रारीही दाखल करण्यात आल्या. स्टॅलिन यांनी तत्काळ माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली. मात्र, देशभरातील या उद्रेकानंतरही स्टॅलिन यांनी आपण आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचे म्हटले आहे.
Mamata Banerjee : उदयनिधींच्या ‘त्या’ वक्तव्यावर ममता बॅनर्जी स्पष्टच बोलल्या, ‘मी सनातन धर्माचा…’