Download App

‘आज 4 जणांशी बोललो एकूण 18 आमदार संपर्कात’; राऊतांचा मोठा दावा

Sanjay Raut On Shinde Camp MLA :  ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाचे 18 आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे. तसेच त्यातील चार आमदारांशी माझे आज बोलणे झाल्याचेही राऊतांनी म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याने शिंदे गटातील आमदार नाराज झाल्याचे बोलले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर राऊतांनी हा दावा केला आहे.

राऊत म्हणाले की, शिंदे गटातले 17 ते 18 आमदार आमच्या संपर्कात आहे. हे खोटं असेल तर पुन्हा शिवसेनेचं नाव घेणार नाही. तिकडचे आमदार आमच्या संपर्कात आहे. ते त्यांच्या व्यथा आणि वेदना आमच्यासमोर मांडत असतात. आम्ही त्या ऐकतो, परंतु त्यावर काही प्रतिक्रिया देत नाही. आजही त्यांच्यापैकी चार जण माझ्याशी बोलले.

NCP Political Crisis : …म्हणून शरद पवारांचा धुळे-जळगाव जिल्हा दौरा झाला रद्द

संजय राऊत म्हणाले, आम्ही त्यांच्याशी बोलतो, त्यांच्या व्यथा ऐकतो, कारण ते आमचे जुने सहकारी आहेत. त्यांनी अनेकवर्ष आमच्याबरोबर काम केलं आहे. आमचे जुने संबंध आहे. मधल्या काळात आमचा एकमेकांशी संपर्क नव्हता. परंतु गेल्या आठ दिवसापासून ते आमच्याशी संपर्क करत आहेत. आम्ही असं म्हणत नाही की, ते आमच्याकडे आले आहेत किंवा आम्ही त्यांना आमच्या पक्षात घेतलं आहे. कारण, तो निर्णय आमच्या पक्षप्रमुखांचा असेल.

आत्ता 44 प्लसचा आकडा, आगे आगे देखो.., आमदार अनिल पाटलांनी व्यक्त केला विश्वास

दरम्यान, अजितदादा यांच्या नेतृत्वात असलेली राष्ट्रवादी सत्तेत आल्यानंतर शिंद गट नाराज असल्याची चर्चा सुरु झाली आहे. शिंदे गटातील अनेक आमदार हे मंत्रिपदासाठी इच्छूक होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिंदेंच्या आमदारांची बैठक झाली व त्यात दोन आमदारामध्ये बाचबाची झाल्याची माहिती आहे. यावरुन शिंदे गटात धुसफूस असल्याचे समोर येते आहे.

Tags

follow us