Download App

Sanjay Raut : तुरुंगात गेलो, यांना काय घाबरायचं ?; हक्कभंगाच्या गदारोळावर राऊतांनी सुनावले

Sanjay Raut : संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विधीमंडळाला चोरमंडळ म्हटल्याने प्रचंड गदारोळ सुरू आहे. या मुद्द्यावर विधीमंडळात (Maharashtra Budget) सत्ताधाऱ्यांनी प्रचंड गदारोळ घातला. राऊतांवर कारवाई करण्याची मागणी केली. त्यानंतर विधीमंडळाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. या सगळ्या प्रकारावर सत्ताधारी पक्षातील नेते राऊत यांच्यावर तुटून पडले आहेत. या सगळ्या गदारोळावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राऊत म्हणाले, की माझ्या भावना समजून घेतल्या पाहिजेत, बाजू समजून न घेता एकांगी पद्धतीने कारवाई केली जात आहे. देशातील सभागृहाचा आदर आहे.

वाचा : Sanjay Raut : राऊतांच्या वक्तव्यावरून विधान परिषदही गाजली

ते पुढे म्हणाले, की चोरांवर संस्कार नसतात, काय अपेक्षा करायची ? कुणाची धिंड निघते पाहू. मी माझ्या पक्षाचा नेता आहे. न घाबरता तुरुंगवास पत्करला, यांना काय घाबरायचं. राज्यातील अनेक प्रश्नांवरुन लक्ष हटविण्यासाठी संजय राऊतला टार्गेट केले जात आहे. मी खासदार असल्याने राज्यसभेच्या कामकाजात सहभाग घेतला आहे. शिवसेनेचा संसदीय लोकशाहीवर विश्वास आहे. त्यामुळे माझ्या भावना समजून घेतल्या पाहिजेत. बाजू समजून न घेता एकांगी पद्धतीने कारवाई होत असेल तर हे लोकशाहीसाठी घातक आहे.

Sanjay Raut यांच्या डोक्यावर परिणाम झालाय, शंभूराज देसाई यांची घणाघाती टीका

मिंधे गटाला मी चोर म्हटलं

विधिमंडळ पक्ष म्हणजे पक्ष नाही.शिवसेना पक्षाचे चिन्ह आणि नावाची चोरी करुन काही लोक विधिमंडळात गेले.त्यांना सरकार स्थापन करुन आमच्यावर हल्ले करत आहेत. विधिमंडळाच्या बाहेर मिंधे गटाचा उल्लेख हा चोर आणि दरोडेखोर म्हणून केला जातो.मिंधे गटाला उद्देशून मी असं वक्तव्य केले आहे. ज्यांनी बेमानी आणि गद्दारी केली त्यांना मी चोर म्हणालो.चोरी करुन ते आतमध्ये गेले.ते स्वतः चोर आहेत त्यांच्यामुळे विधिमंडळाची बदनामी होते.

Tags

follow us