Sanjay Raut : कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण (Ashok Chavhan) यांच्या भाजप प्रवेशाबाबतच्या जोरदार चर्चांदरम्यान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी ट्विट करत एक खोचक सवाल केला आहे. राऊत म्हणाले की, ‘एकनाथ मिंधे व अजित पवार यांच्या प्रमाणे चव्हाण सुध्दा आता काँग्रेस वर दावा सांगून हात चिन्ह मिळवणार काय?’ असं राऊत म्हणाले.
Bramayugam: प्रेक्षकांच्या मनात धडकी भरवणारा..; मामूट्टीच्या “ब्रह्मयुगम”चा भयानक ट्रेलर रिलीज
चव्हाणही काँग्रेसवर दावा सांगून हात चिन्ह मिळवणार?
आपल्या या ट्विटमध्ये राऊत यांनी लिहिले की, अशोक चव्हाण भाजपवासी झाले.विश्वास बसत नाही. काल पर्यंत ते सोबत होते.. चर्चा करीत होते..आज गेले. एकनाथ मिंधे व अजित पवार यांच्या प्रमाणे चव्हाण सुध्दा आता काँग्रेस वर दावा सांगून हात चिन्ह मिळवणार काय? आणि निवडणूक आयोग त्यांना ते देणार काय? आपल्या देशात काहीही घडू शकते! असं राऊत म्हणाले.
अशोक चव्हाण भाजपवासी झाले.विश्वास बसत नाही. काल पर्यंत ते सोबत होते.. चर्चा करीत होते..आज गेले.
एकनाथ मिंधे व अजित पवार यांच्या प्रमाणे चव्हाण सुध्दा आता काँग्रेस वर दावा सांगून हात चिन्ह मिळवणार काय?
आणि निवडणूक आयोग त्यांना ते देणार काय?
आपल्या देशात काहीही घडू शकते!… pic.twitter.com/tjX1XzL3Ns— Sanjay Raut (@rautsanjay61) February 12, 2024
अशोक चव्हाणांचा काँग्रेसला रामराम!
राज्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) हे लवकरच मोठा राजकीय निर्णय घेण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार,माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सोपविला आहे. (Maharashtra Politics) तसेच त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांची भेट घेऊन चर्चाही केली. या दोघात झालेल्या चर्चेची माहिती अद्याप स्पष्ट झाली नाही. मात्र, या सगळ्या घडामोडी पाहता अशोक चव्हाण भाजपामध्ये प्रवेश करण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे.
Ashok Chavhan यांच्या प्रवेशाबाबत फडणवीसांचे संकेत पण बावनकुळेंकडे प्रस्ताव नाही; गौडबंगाल काय?
फडणवीसांचं सूचक वक्तव्य…
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण (Ashok Chavhan) यांच्या भाजप प्रवेशाबाबतच्या चर्चांदरम्यान एक सूचक वक्तव्य केलं आहे. फडणवीस म्हणाले की,आज मी एवढेच म्हणेल की आगे आगे देखो होता है क्या. भारतीय जनता पक्ष सोबत वेगवेगळ्या पक्षांचे अनेक मोठे नेते येऊ इच्छित आहेत विशेषतः काँग्रेसचे अनेक नेते आमच्या संपर्कात आहेत. फडणवीस पत्रकार परिषदेत बोलत होते.