Bramayugam: प्रेक्षकांच्या मनात धडकी भरवणारा..; मामूट्टीच्या “ब्रह्मयुगम”चा भयानक ट्रेलर रिलीज

Bramayugam: प्रेक्षकांच्या मनात धडकी भरवणारा..; मामूट्टीच्या “ब्रह्मयुगम”चा भयानक ट्रेलर रिलीज

Bramayugam Trailer Released: मल्याळम चित्रपटांची लोकप्रियता सध्या जोरदार वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या प्रेक्षक मल्याळ चित्रपटांचा खूप आनंद घेत आहेत. आता आणखी एक नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी आला आहे. मल्याळम इंडस्ट्रीचा सुपरस्टार मामूट्टीचा (Mammootty) ‘ब्रह्मयुगम’ (Bramayugam Movie) या हॉरर चित्रपटाचा ट्रेलर रिलीज (Bramayugam Trailer) झाला आहे, जो खूपच भीतीदायक असल्याचे पाहायला आहे.

मल्याळम चित्रपट ब्रह्मयुगमचा धडकी भरवणारा ट्रेलर रिलीज झाला आहे. (Social Media) या चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा एकदा हा अभिनेता आपल्या वेगळ्या आणि नव्या व्यक्तिरेखेने चाहत्यांचे होश उडवताना दिसणार आहे. हा 2:38 मिनिटांचा ट्रेलर पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच हसू येणार आहे. ट्रेलरच्या शेवटी, मामूटी म्हणतो की, “हे ब्रह्मयुगम आहे, कलियुगातील आणखी एक विकृत युग आहे.

यानंतर, अभिनेत्याच्या भितीदायक हास्याने ट्रेलर संपतो. मामूट्टीचे आश्चर्यकारक परिवर्तन ट्रेलरमध्ये बघायला मिळाले आहे.या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राहुल सदाशिवन यांनी केले आहे.

Video: चाहत्याला मारलं, मग फोनच फेकून दिला; लाईव्ह कॉन्सर्टमध्ये आदित्यचं गैरवर्तन

याआधीही राहुलने भूतकलम हा हॉरर चित्रपट दिग्दर्शित केला होता, जो सुपरहिट ठरला होता. अशा परिस्थितीत या चित्रपटाकडून चाहत्यांनाही खूप अपेक्षा आहेत. हा चित्रपट 15 फेब्रुवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. मामूट्टीने 2023 मध्ये ‘कथल-द कोअर’ आणि नानापकल नेराथु मायाक्कम यांसारख्या चित्रपटांसह मोठे यश मिळवले होते.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज