मुंबई : सर्वोच्च न्यायालयामध्ये (Supreme Court) आम्ही एक याचिका दाखल केली आहे. लवकरच त्यावर सुनावणी सुरु आहे. निवडणूक आयोगानं (Election Commission)ज्या पद्धतीचा निकाल दिला आहे, तो अत्यंत चुकीचा आहे. शिंदे गटाचा आनंद औट घटकेचा ठरणार आहेत त्यामुळं 2024 ला खेळ संपणार असल्याचंही यावेळी खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांनी म्हटलंय. घटनाबाह्य आणि वस्तूस्थितीला धरुन नसल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय. मूळ पक्ष शिवसेना आहे. त्यातून काही आमदार खासदार फूटून गेले आहेत. ते पक्षाच्या चिन्हावर निवडून आले आहेत. उद्या त्यांचा पराभव होऊ शकतो. त्यांना उमेदवार उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
आज ते आमदार खासदार आहेत. त्यांना मिळालेली मतं ही उद्धव ठाकरे आणि आम्ही सर्वांनी फिरून मिळवलेली मतं आहेत. त्यामुळं हे आमदार, खासदारांच्या पराभवानंतर निवडणूक आयोग हा निकाल फिरवणार आहे का? असा सवालही यावेळी खासदार राऊत यांनी उपस्थित केला आहे.
Rohit Pawar : कोश्यारी आता काही बोलतील, कोणीही विश्वास ठेवू नये
निवडणूक आयोगानं अत्यंत आंधळेपणानं, दबावाखाली हा निर्णय दिला आणि त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. घेतलं त्यांनी ताब्यात ठिक आहे आम्ही महाराष्ट्रात आहोत, उद्या दिल्लीत जाऊ पाहू काय करायचं?
आज शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठकीवर प्रश्न विचारल्यावर खासदार राऊत म्हणाले की, मला उद्धव ठाकरे यांच्याकडून आमंत्रण नाही तुम्ही कोणत्या शिवसेनेबद्दल बोलत आहात मला माहीत नाही, इलेक्शन कमिशननं शिवसेना म्हटलेल्या शिवसेनेला आम्ही मानतच नाही. शिवसेनेची कार्यकारिणी अगोदरचं झाली आहे. उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुख आहेत. असे प्रकार गटातटाचे होत असतात, त्यामुळं हा खेळ औट घटकेचा खेळ आहे. कधीतरी या खेळ किती काळ चालतो ते पाहूया. कोणीही राजकारणात अमरपट्टा घेऊन आलेलं नाही. 2024 साली खेळ संपलेला असेल, असा इशाराही यावेळी खासदार संजय राऊत यांनी दिलाय.