भ्रष्टाचाऱ्यांना शुध्द करुन भाजप त्यांना आपल्या पक्षात घेते…राऊतांची टीका

पुणे : सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप – प्रत्यारोप हे सुरूच असतात. यातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी तपास यंत्रणा व भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून भाजपवर निशाणा साधला आहे. भ्रष्टाचा-यांना पाठीशी घालणारे हे सरकार आहे. ज्यांना ईडी सीबीआयने नोटीसा काढल्या आहेत त्यांना शुध्द करुन आपल्या पक्षात भाजपने (BJP) घेतले अशा शब्दात राऊतांनी भाजपवर थेट हल्लाबोल […]

Untitled Design (33)

Untitled Design (33)

पुणे : सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप – प्रत्यारोप हे सुरूच असतात. यातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी तपास यंत्रणा व भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून भाजपवर निशाणा साधला आहे. भ्रष्टाचा-यांना पाठीशी घालणारे हे सरकार आहे. ज्यांना ईडी सीबीआयने नोटीसा काढल्या आहेत त्यांना शुध्द करुन आपल्या पक्षात भाजपने (BJP) घेतले अशा शब्दात राऊतांनी भाजपवर थेट हल्लाबोल केला आहे.

दरम्यान राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आपण दौंड येथे होणाऱ्या शेतकरी मेळाव्याला जाणार आहोत अशी माहिती दिली आहे. दौंडच्या शेतक-यांनी मला बोलावल आहे, पुढील दोन आठवड्यात मी दौंडला जाणार आहे, शेतक-यांच्या सभेस मी हजर राहणार आहे असे राऊत यांनी म्हंटले आहे.

तसेच पुढे बोलताना राऊत म्हणाले, मी दौंडच्या भीमापाटस कारखान्यास भेट देणार आहे. भीमा पाटस बाबत मी सातत्याने आवाज उठविला आहे. राज्याचे मुख्यमंत्री भ्रष्टाचार करणा-यांवर कारवाई का करत नाही, असा सवाल राऊत यांनी केला. तपास यंत्रणा विरोधकांच्या मागे लावतात ना मग त्यांचाही तपास व्हायला हवा. आमदार राहुल कुल यांनी या सर्व बाबींचा हिशेब द्यावा असे आव्हानही त्यांनी दिले.

अंडरवर्ल्डप्रमाणं शिंदे आणि फडणवीसांच्या टोळ्या…राऊतांचा हल्लाबोल

आणखी एका भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर बोलताना राऊत म्हणाले, मालेगावच्या गिरणा सहकारी साखर कारखान्याचेही एक प्रकरण मी दिलेले आहे. शेतक-यांच्या नावावर 178 कोटींचे शेअर्स गोळा केले, कुठ आहे तो कारखाना? या बाबत मी सीबीआय कडे तक्रार दाखल करतोय. भ्रष्टाचा-यांना पाठीशी घालणारे हे सरकार आहे असा आरोप राव यांनी केला. तसेच ज्यांना ईडी सीबीआयने नोटीसा काढल्या आहेत त्यांना शुध्द करुन आपल्या पक्षात भाजपने घेतलेअशा शब्दात राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

तुझेही रोशनी शिंदे सारखे हाल करू…ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारीला धमकी

त्या आमदार – खासदारांवरील कारवाया थांबल्या
शिवसेनेत बंड झाले व यातून शिंदे गट व ठाकरे गट तयार झाला. शिंदे गटातील आमदार – खासदारांवर देखील राऊत यांनी निशाणा साधला आहे. राऊत म्हणाले, शिवसेनेतून बंडखोरी करून बाहेर पडलेले जे आमदार आहेत त्या पैकी अकरा आमदारांवर आणि नऊ खासदारांवर ईडी व सीबीआयचे खटले सुरु आहेत, हे खटले आता थांबवले गेले आहेत असा सवाल राऊत यांनी सत्ताधाऱ्यांना केला आहे.

Exit mobile version