Download App

‘कुणाचाही बाप येवू दे…’, संतोष देशमुख प्रकरणावरून मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

Santosh Deshmukh Murder Case : बीड (Beed) जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरण

  • Written By: Last Updated:

Santosh Deshmukh Murder Case : बीड (Beed) जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरण संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरला आहे. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत चार आरोपींना अटक केली आहे. तर दुसरीकडे या प्रकरणात राजकारण देखील जोरात सुरू आहे. आतापर्यंत अनेक नेतेमंडळी देशमुख कुटुंबियांची भेट घेतली आहे तर मराठा समाजाला आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) देखील देशमुख कुटुंबियांच्या भेटीला जाणार आहे. मात्र त्यापूर्वी या प्रकरणात माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल करत प्रकरण दाबू देणार नाही असा इशारा दिला आहे.

माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, कुणाचाही बाप येवू द्या, मस्साजोग प्रकरण दाबू देणार नाही, संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी जनतेनं 28 तारखेला बीडमध्ये मोर्चा काढला आहे. अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील यांनी दिली.

पुढे बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, कोणताही जहांगिरदार आला तरी हे प्रकरण दबू देणार नाही आणि मी हटणारही नाही असं जरांगे पाटील यांनी म्हंटलं आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटलं आहे की कुणालाही सोडणार नाही. पण कधी, यांना तपासाला इतका वेळ का लागतो आहे ? असे देखील जरांगे पाटील म्हणाले. जरांगे पाटील उद्या देखमुख कुटूंबियांना भेटणार आहे.

तर दुसरीकडे या प्रकरणात तीन आरोपींना आज न्यायालयाने सहा जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी या प्रकरणात जयराम चाटे, महेश केदार आणि प्रतिक घुले यांना अटक केली आहे. आज या आरोपींना केज न्यायालयात हजर करण्यात आले होते.

बबन गित्ते खरचं आरोपी? आमदार सुरेश धस यांचा मोठा गौप्यस्फोट

आज केज न्यायालयाने आरोपींना 6 जानेवारी 2025  पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर चौथा आरोपी विष्णू चाटेला देखील 27 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. सध्या या प्रकरणात तीन आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे.

follow us