बबन गित्ते खरचं आरोपी? आमदार सुरेश धस यांचा मोठा गौप्यस्फोट
Suresh Dhas On Baban Gite : बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्याकांडावरुन आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे तर आता भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते बबन गित्ते (Baban Gite) यांच्याबद्दल पत्रकार परिषदेमध्ये बोलताना मोठा गोप्यस्फोट केला आहे.
या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना भाजप आमदार सुरेश धस म्हणाले की, परळीतील खून प्रकरणात त्यांची चूक काय होती? बबन गित्ते खरचं आरोपी आहे का? तरीही देखील त्यांचे नाव टाकण्यात आले आहे. राजकारण विरोधक असतात आम्हाला पण विरोधक आहे. पण असं थोडी आहे की, त्याचा कार्यक्रमच करायचा असं या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना भाजप आमदार सुरेश धस म्हणाले. तसेच परळीत सांगतो या प्रकरणात किती आरोपी होते. असं देखील ते म्हणाले.
या पत्रकार परिषदेमध्ये पुढे बोलताना त्यांनी पुन्हा एकदा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. माझ्या बूथ प्रमुखाची हत्या झाली. संतोष देशमुख हा भाजपचा बूथ प्रमुख होता त्यामुळे मी या प्रकरणात जास्त सहभागी आहे. तसेच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणाला धनंजय मुंडे तुम्ही समर्थन देत आहात का? आणि गोपीनाथ गडावरून हे बोलता? तुम्ही कोणत्या दुनियेत वागताय? तुमची स्टाईल कशी आहे धनु भाऊ? तुम्हाला सिरियसनेस काय आहे? अशी टीका त्यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर केली.
तसेच माधव जाधव प्रकरणात त्याची काय चूक होती कोठे गुन्हे दखल केले जात आहे? डॉक्टर वर गुन्हा दाखल केला हे खरं आहे का? आता पर्यंत किती प्रकरण झाले? बबन गित्ते खरचं आरोपी होता का? परळीत सांगतो या प्रकरणात किती आरोपी होते असं देखील ते म्हणाले.
तर मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अमानवी खुनाच्या प्रकरणात बाळासाहेब कोल्हे यांची नियुक्ती केली आहे. काल रात्री मी एसआयटी संदर्भात विचारणा केली आणि मुख्यमंत्री यांनी कालच पत्रावर सही केली त्यामुळे या प्रकरणात लवकरच एसआयटी स्थापन होणार असल्याची माहिती देखील त्यांनी या पत्रकार परिषदेमध्ये दिली.
तसेच आरोपींना 15 दिवसांचा पीसीआर मिळाला ही समाधानाची बाब आहे. सीआयडी अधिकाऱ्यांना तपास करण्यासाठी गती मिळेल. आयजी लेवलचे अधिकारी, ज्युडिशिअल तपासणी होणार यासाठी मुख्यमंत्र्यांनी मनावर घेतले आहे. असेही या पत्रकार परिषदेमध्ये आमदार सुरेश धस म्हणाले.
तर 28 तारखेच्या मोर्चाला मी देखील उपस्थित राहणार आहे. मी कोणालाच घाबरत नाही. अका 302 मध्ये सुध्दा आहे. परळीतील डूबे प्रकरणात आरोपी कोणता दाखलवा? किती पैसे देवून प्रकरण मिटले हे समोर येईल. ते परळीतील लोक सुद्धा मला भेटणार आहेत. मी 1999 पासून आमदार आहे. त्यामुळे हे वागणं कुठलं आहे? काही रेकॉर्डिंग व्हायरल करा, पिस्तुलच्या लायसनला परवानगी कुणाची? हे लायसन रद्द करा. अशी मागणीही या पत्रकार परिषदेमध्ये सुरेश धस यांनी केली.