Pushpa 2 ची क्रेझ, सोमवारी 12.25 कोटींची कमाई तरीही निर्मात्यांना धक्का, जाणून घ्या 19 व्या दिवशी घडलं काय?

  • Written By: Published:
Pushpa 2 ची क्रेझ, सोमवारी 12.25 कोटींची कमाई तरीही निर्मात्यांना धक्का, जाणून घ्या 19 व्या दिवशी घडलं काय?

Pushpa 2 Box Office Collection Day 19: गेल्या काही दिवसांपासून ‘पुष्पा 2: द रुल’ ची बॉक्स ऑफिसवर जबरदस्त क्रेझ पाहायला मिळत आहे. ‘पुष्पा 2: द रुल’ (Pushpa 2) दररोज बॉक्स ऑफिसवर नवीन नवीन रेकॉर्ड बनवत आहे. सोमवारी चित्रपटगृहात प्रदर्शित होऊन चित्रपटाला 19 दिवस पूर्ण झाले आहे.

19व्या दिवशी बंपर कमाई ‘पुष्पा 2: द रुल’ ने 19व्या दिवशी जबरदस्त कमाई करत 12.25 कोटींची कमाई केली आहे. Sacnilk च्या मते या चित्रपटाने रविवारी बॉक्स ऑफिसवर 32.95 कोटी रुपयांची कमाई केली होती आणि सोमवारी 12.25 कोटींची कमाई केली आहे. आतापर्यंत ‘पुष्पा 2’ ने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 1074.85 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. दुसरीकडे, हा चित्रपट लवकरच जगभरातील बॉक्स ऑफिसवर 1600 कोटींच्या क्लबमध्ये सामील होणार आहे. सोमवारी ‘पुष्पा 2: द रुल’ 1600 कोटींच्या क्लबमध्ये सामील होणार असल्याची शक्यता वर्तण्यात येते होती मात्र असं न झाल्याने निर्मात्यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.

जगभरातील कमाईबद्दल बोलायचे झाले तर या चित्रपटाने जवळपास 1520 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाने आतापर्यंत परदेशात सुमारे 245.00 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाने भारतात 1266.7 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे. त्यामुळे मंगळवारी बॉक्स ऑफिसवर ‘पुष्पा 2: द रुल’ जबरदस्त कमाई करत 1600 कोटींच्या क्लबमध्ये सामील होणार का? हे पाहावे लागेल.

‘पुष्पा 2: द राइज’च्या जबरदस्त यशानंतरच निर्मात्यांनी आत तिसऱ्या भागावर काम सुरु केले आहे. या चित्रपटात अल्लू अर्जुनसोबत रश्मिका मंदान्ना दिसणार आहे. दोघांची रोमँटिक केमिस्ट्री लोकांना पसंत पडत आहे. या चित्रपटात अल्लू अर्जुनसोबत फहद फासिलचा ऑनस्क्रीन संघर्ष पाहण्याचा आनंदही लोकांनी घेतला आहे.

६ लाखांची जुनी कार १ लाखांत विक्री अन् ९० हजारांचा GST; व्हायरल पोस्टमागचं सत्य मात्र वेगळंच!

तर दुसरीकडे अल्लू अर्जुन (Allu Arjun) हैदराबादमधील थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाल्यामुळे अडचणीत सापडला आहे. या प्रकरणी अल्लूला पोलिसांनी ताब्यात घेतले आणि या प्रकरणात अभिनेता एक रात्र कारागृहातही राहिला. या अभिनेत्याला मंगळवारी पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात आले. मृत महिलेचा मुलगा अद्याप गंभीर असून तो रुग्णालयात आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube